esakal | कोरोनाची लाट रोखण्यासाठी गरज काँटॅक्ट ट्रेसिंगची! औरंगाबादेत सुपर स्प्रेडरचे व्हावे सर्वेक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_1180

युरोपियन देशांत उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता भारतातही दुसरी लाट येण्याची शक्यता जानेवारी-फेब्रुवारीत दिसत आहे.

कोरोनाची लाट रोखण्यासाठी गरज काँटॅक्ट ट्रेसिंगची! औरंगाबादेत सुपर स्प्रेडरचे व्हावे सर्वेक्षण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : युरोपियन देशांत उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता भारतातही दुसरी लाट येण्याची शक्यता जानेवारी-फेब्रुवारीत दिसत आहे. कोरोनामुळे सर्वाधिक होरपळलेल्या महाराष्ट्राला पहिल्या लाटेतून धडा घेण्याची गरज असून जागरूकतेच्या व सुरक्षाविषयक उपाय करण्याची अधिक गरज आहे. जवळपास बंद झालेली ‘काँटॅक्ट ट्रेसिंग’ जोमाने करण्याची गरज आहे. सुपर स्प्रेडर व्यक्ती व सामूहिक बाबींचेही सर्वेक्षण करण्याची गरज आहे.

Cycle for Change : औरंगाबादेत तब्बल तीनशे टक्क्यांनी वाढली सायकलची विक्री


जानेवारीनंतर कोरोनाचा उद्रेक इटली, स्पेन, अमेरिका, ब्राझील आदी देशांत मोठ्या प्रमाणात झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी देशात व त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मोठा उद्रेक झाला. ही वाताहत सप्टेंबरपर्यंत सुरू होती. त्यानंतर कोरोना उद्रेकाचा उतरता काळ सुरू झाला. उद्रेकात आपण युरोपियन देशाच्या दोन ते तीन महिने मागे आहोत. आता तेथे उद्रेक झाल्यानंतर जानेवारीत देशातही उद्रेक होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यानुसार आता अधिक सक्षमपणे सामोरे जाण्याची गरज असून खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. प्रयोगशाळा तपासणी जोरकसपणे सुरू ठेवण्याची आवश्‍यकता आहे. संशयित रुग्णांची तपासणी करण्यावर भर देण्याची गरज आहे.

दारोदार व्हावे सर्वेक्षण
सुपर स्प्रेडर अर्थात ज्यांचा मोठा जनसंपर्क आहे, सातत्याने जनमाणसांत जे लोक राहतात अशा लोकांची कोविड तपासणी व्हायला हवी. तसेच अशा व्यक्तींचे सर्वेक्षणही सातत्याने व्हायला हवे. ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असलेले रुग्णांच्या सर्वेक्षणावर सातत्याने भर हवा.

ही आहे वस्तुस्थिती
- काँटॅक्ट ट्रेसिंग पूर्णतः बंद
- सुपर स्प्रेडरकडे दुर्लक्ष
- अनलॉकमुळे कोविड संसर्ग नसल्याचा समज
- मास्क वापरणे बंद, आरोग्यविषयक खबरदारीला फाटा
- सामूहिक कार्य सुरू, विशिष्ट अंतर राखणे बंद
- वस्तू, परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे टाळणे

या बाबींची गरज
- बाजारातील, रस्त्यावरील गर्दीवर अंकुश हवा
- मास्क वापर अधिक जागरूकतेने करण्याची आवश्‍यकता
- विविध वस्तू विक्रेत्यांनी सुरक्षिततेचे उपाय करायला हवे
- सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये सुरक्षेचे उपाय हवे
- या वाहनांचे सातत्याने निर्जंतुकीकरण (सॅनेटाईज) व्हावे
- गर्दीवर नियंत्रण हवे, कार्यक्रमावरही काही काळ नियंत्रण हवे
- लॉकडाउन नको व संसर्गही होऊ नये यात सुवर्णमध्य साधण्याची गरज
- रुग्णालयांतील साधने व साहित्य, उपकरणांची पूर्तता व्हावी
- मनुष्यबळ, रुग्णवाहिका आणि बेड्स वाढविण्यावरही आणखी भर हवा

Edited - Ganesh Pitekar

loading image