esakal | Cycle for Change : औरंगाबादेत तब्बल तीनशे टक्क्यांनी वाढली सायकलची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल.jpg

सायकल फॉर चेंज उपक्रमामुळे नागरिकांना प्रोत्साहन 

Cycle for Change : औरंगाबादेत तब्बल तीनशे टक्क्यांनी वाढली सायकलची विक्री

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात सायकलच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून, ही वाढ तब्बल ३०० टक्क्यांनी आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने ‘सायकल फॉर चेंज’ हा उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाचा परिमाण म्हणून सायकल खरेदीत वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शहराचे प्रदूषण कमी व्हावे, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ‘सायकल फॉर चेंज’ अभियान देशभर राबविले जात आहे. त्यानुसार शहरात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने देखील उपक्रम हाती घेतला आहे. त्यात सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करून देण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केली. सध्या सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या उपक्रमात सायकल असोसिएशन, स्वयंसेवी संस्था, एएससीडीसीएलचे अधिकारी आणि शहर पोलिसांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक अधिकाऱ्याने महिन्याच्या पहिल्या दिवशी सायकलने कार्यालयात यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्याला शहरातील व्यावसायिक, महापालिका व एएससीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरात सायकल खरेदीत वाढ झाली आहे. सायकलच्या विक्रीत तब्बल ३०० पटीने वाढ झाल्याचे पैठणगेट येथील लुधियाना सायकल मार्टचे निखिल मिसाळ यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नागरिकांचा प्रतिसाद पाहता मराठवाडा पदवीधर मतदारसंघच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच सायकल ट्रॅकचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे एएससीडीसीएलचे डेप्युटी सीईओ पुष्काल शिवम् यांनी सांगितले. 

go to top