esakal | पंकजा मुंडेंचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैध विक्रीवरून अजित पवारांना पत्र

बोलून बातमी शोधा

pankaja munde and ajit pawar

पंकजा मुंडेंचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैध विक्रीवरून अजित पवारांना पत्र

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

बीड: राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. रोज ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. अशात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयात गंभीर रुग्णांनाही बेड मिळत नाहीयेत. अशातच राज्यात बऱ्याच ठिकाणी रेमडेसिव्हिरचा काळा बाजार सुरु असल्याचे दिसत आहेत.

बीडमधील रेमडेसिव्हिरच्या काळ्या बाजाराबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहले आहे. यामध्ये जिल्ह्यात काही पक्षांच्या कार्यालयातून रेमडेसिव्हिरची अवैध विक्री सुरू असल्याचे सांगितले आहे. बीडमध्ये विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयातूनही रेमडेसिव्हिरची विक्री करत असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक

रेमडेसिव्हिरची विक्री जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणावरूनच होईल असं सरकारने सांगितले आहे. पण राज्यभरात अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिरची अवैध विक्री होत असल्याचे दिसत आहे. बीडमधील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयातील बेड भरलेले आहेत.

हेही वाचा: जोरदार वादळी वाऱ्याने घरांची पडझड,औरंगाबाद तालुक्यात एक जण जखमी

राज्यात पुन्हा नवीन रुग्णांची उसळी-

मागील २४ तासांत राज्यात ६६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापुर्वी रुग्णसंख्या कमी होऊन ती ४८ हजारांपर्यंत गेली होती पण रुग्णवाढीने पुन्हा जोर धरल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात काही पक्षांच्या कार्यालयातून मडेसिव्हिरची अवैध विक्री सुरू आहे. या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांना यात लक्ष घालावे.

- पंकजा मुंडे