esakal | कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

इस्कॉनतर्फे एका क्वारंटाइन सेंटरमध्ये व शहराच्या एन्ट्री पॉइंटवर अॅन्टीजेन टेस्ट करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सकाळचा नाष्टा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण, आवश्‍यकतेनुसार दूध बिस्कीट दिले जात आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः शहरातील हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनतर्फे कोरोनाबाधित रुग्ण व महापालिकेच्या कारोना योद्ध्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. सुमारे पाचशे जणांचे जेवण सध्या दिले जात असून, सोबत एक दिवसाआड भिजवलेले बदाम व अक्रोडाचा खुराकही दिला जात आहे. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच महापालिकेलाही मोठी मदत झाली आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण व क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण पुरविताना महापालिकेची दमछाक सुरू होती. अनेक कंत्राटदार बदलल्यानंतर महापालिकेने स्‍वतःचे किचन सुरू केले मात्र एक ते दीड हजार जणांचे जेवण तयार करताना मोठी तारांबळ उडत होती. म्हणून किचनचा प्रयोग अवघ्या दिवसातच थांबला. दरम्यान निविदा काढून कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने सुरुवातीपासून इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनला जेवण पुरविण्याची गळ घातली होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मात्र इस्कॉनतर्फे फक्त खिचडी तयार केली जाते. त्यामुळे नकार कळविण्यात आला होता. पण प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी संचालक मंडळाशी चर्चा करून जेवण पुरवठा सुरू करण्यासाठी पुन्हा विनंती केली. त्यानुसार पाचशे जणांच्या जेवणाची सोय इस्कॉनतर्फे केली जात आहे. एका करवंटाइन सेंटरमध्ये व शहराच्या एन्ट्री पॉइंटवर अॅन्टीजेन टेस्ट करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सकाळचा नाष्टा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण, आवश्‍यकतेनुसार दूध बिस्कीट दिले जात असल्याचे सहाय्यक आयुक्त विजया घाडगे यांनी सांगितले. 

असा आहे मेन्यू 
दोनवेळच्या जेवणासोबतच सकाळी नाष्ट्यासोबत एक आड दिवस भिजवलेले पाच बदाम व अक्रोड दिले जात आहेत. सकाळी चहा, संध्याकाळी आयुष काढा व रात्री हळदीचे गरम दूध दिले जात आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पुन्हा २९ जणांना मिळाला निवारा 
शहरात अनेक जण बेघर आहेत. हे नागरिक रेल्वेस्टेशन, बसस्थानक, उड्डाणपुलाखाली राहतात. लॉकडाऊनच्या काळात त्यंची उपासमार होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने बेघर व्यक्तिंचा शोध घेऊन त्यांना निवारागृहात पाठविण्याची मोहिम हाती घेतली आहे. २९ जणांचे समुपदेशन करून त्यांना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मोतीकारंजा, गांधीनगर, रेल्वे स्टेशन, सिडको, चिकलठाणा येथील शहरी बेघर निवाऱ्यात निवारा देण्यात आला.

loading image
go to top