वैद्यकीय शिक्षणमंत्री महोदय, डाॅक्टर कोरोनाशी झुंज देतोय, करणार का मदत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅ.राहुल पवार

आईवडिलांनी कर्ज काढून डाॅ. राहूलच्या उपचारावर खर्च केला आहे. आता पुढचा खर्च त्यांना पेलणे शक्य नाही. अशा वेळी शासनाने विशेषतः वैद्यकीय मंत्री अमित देशमुखांनी पुढाकार घेऊन राहुलला मदत करण्याची गरज आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री महोदय, डाॅक्टर कोरोनाशी झुंज देतोय, करणार का मदत?

औरंगाबाद : एक इंटर्न तरुण डाॅक्टर (MBBC Intern Doctor) गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) कोरोनाशी (Corona) सामना करत आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्या तरुण डाॅक्टरचे नाव राहुल पवार आहे. त्याचे आईवडील ऊसतोड मजूर आहेत. त्यांनी कर्ज काढून राहूलच्या उपचारावर खर्च केले असून आता पुढचा खर्च त्यांना पेलणे शक्य नाही. अशा वेळी शासनाने विशेषतः वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी (Medical Education Minister Amit Deshmukh) पुढाकार घेऊन राहुलला मदत करण्याची गरज आहे. मदतीबाबत ई-सकाळने डाॅ.राहुल पवारच्या एका सहकार्याशी संपर्क साधला. आतापर्यंत उपचारासाठी आठ लाख खर्च आला असून त्यापैकी दोन लाखांच्या वर मदतनिधी जमा झाल्याने सांगितले. काही रक्कम एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय (MIMSR Medical College) देणार आहे. फ्रन्टलाईन वर्कर असतानाही तातडीने शासनाने राहुलला मदत करणे अपेक्षित होते. मात्र आता सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरु झाल्यानंतर काही मंत्र्यांनी त्याच्या मित्रांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. (Corona Positive Doctor Rahul Pawar Needs Money For Treatment)

हेही वाचा: लॉकडाऊनने हिरावला ‘पेरू’च्या उत्पन्नाचा गोडवा

एमबीबीएस इंटर्न

राहुल हा लातूर (Latur) येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस इंटर्न म्हणून कार्यरत आहे. तो मूळचा राहणारा परभणी (Parbhani) जिल्ह्यातील लिंबा (ता.सोनपेठ) येथील आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करणे त्याच्या आईवडिलांना शक्य नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी आर्थिक मदत करण्याचे सोशल मीडियावर लोकांना आवाहन केले आहे.

औरंगाबादचे खासदारांनी केले मदतीसाठी ट्विट

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) लोकांना डाॅ. राहुल पवार याला उपचारासाठी मदत करावे, असे आवाहन ट्विट करुन केले आहे. राहुल ज्या जिल्ह्यात इंटर्न म्हणून कार्यरत आहे, त्याचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आहेत. त्यांनी जर त्वरीत मदतीचे आदेश दिल्यास राहुलला लवकर उपचार मिळतील.

loading image
go to top