esakal | हुश्‍श... औरंगाबाद शहर कोरोनामुक्तीकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 testing

हुश्‍श... औरंगाबाद शहर कोरोनामुक्तीकडे!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: शहरातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. त्यामुळे ॲन्टीजेन चाचणीतून कोणी पॉझिटिव्ह आढळून येत नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. मंगळवारी (ता.१३) दिवसभरात शहराचे सहा एंट्री पॉइंट, सरकारी कार्यालयांमध्ये तब्बल १००४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. तसेच शहरातील महापालिका केंद्रांवर दिवसभरात केलेल्या चाचण्यांत फक्त आठ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील ॲक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असले तरी महापालिकेतर्फे ॲन्टीजेन पद्धतीच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे तीस ते ४० चाचण्या करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. शहरात मात्र दिवसभरात एक ते दीड हजार चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला तेव्हा महापालिकेने शहरातील प्रमुख सरकारी कार्यालये, शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर प्रवाशांच्या चाचण्या सुरू केल्या होत्या. अद्याप याठिकाणी चाचण्या सुरूच आहेत.

हेही वाचा: Covid 19: दिलासादायक! परभणी जिल्ह्यातील ९९ टक्के बेड्स रिक्त

सध्या त्यातून पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. मंगळवारी दिवसभरात सहा एंट्री पॉइंटवर ८२१ प्रवाशांच्या तर नऊ सरकारी कार्यालयांमध्ये मिळून ६६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. पण सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या. मंगळवारी महापालिकेच्या केंद्रांवर दिवसभरात फक्त आठ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रेल्वेस्टेशन व विमानतळावर सोमवारी (ता. १२) घेण्यात आलेल्या स्वॅबधून एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

मंगळवारी झालेल्या चाचण्या -
महापालिका मुख्यालय- १०
पोलीस आयुक्तालय - ४६
उच्च न्यायालय- १२
जिल्हाधिकारी कार्यालय- ३०
विभागीय आयुक्त कार्यालय - १९
आरटीओ कार्यालय- १६
जिल्हा न्यायालय - २४
कामगार उपआयुक्त कार्यालय - १४
कामगार कल्याण कार्यालय - १२

हेही वाचा: COVID-19| आष्टीतील रुग्णवाढीत घट तर बीड, गेवराईमध्ये रुग्ण वाढले

एंट्री पाईंट
चिकलठाणा - २०७
हर्सूल टी पॉईंट- ६६
कांचनवाडी - १२०
झाल्टा फाटा - १६२
नगर नाका - ४१
दौलताबाद टी पॉइंट - २२५

loading image