कोरोनामुळे नर्सिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थिनींचा वाढला ओढा

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः कोरोनाच्या संकटानंतर नर्सेसच्या मागणीत वाढ झाल्याने ‘ए.एन.एम.’ या नर्सिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थिनींचा ओढा वाढत आहे. आकर्षक वेतन आणि पूरक सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने या क्षेत्रात करिअर करणे हा यशाचा राजमार्ग ठरू शकतो, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 


मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. सामाजिक आरोग्य सेवा पुरविणे, माता-बाल सेवा पुरविणे तसेच नर्सिंगसंबंधीचे प्रशासन तसेच व्यवस्थापनविषयक कामे पाहणे, रुग्ण व नातेवाइकांना आरोग्य सल्ला देणे अशी कामे नर्सेस करतात. सद्यःस्थितीत जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी जगभर युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या संकटाचा सामना करून ‘आरोग्य सेवा’च जग वाचवू शकते हे स्पष्ट झाल्याने लोक आरोग्य सेवेकडे देवासारखे पाहू लागलेत.

संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्सिंग सेवेतील कर्मचारी स्वत:च्या जिवाची काळजी न करता प्रत्येकांचे जीव वाचवत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आरोग्य सेवेत नर्सेसची मागणी वाढल्याने यंदा नर्सिंगच्या ‘ए.एन.एम’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थिनींचा ओढा वाढला आहे. महाराष्ट्रामध्ये ‘ए.एन.एम.’चे ४५० नर्सिंग स्कूल, कॉलेज असून प्रत्येक कॉलेजमध्ये २० विद्यार्थीसंख्येप्रमाणे वर्षाला ९ हजार विद्यार्थी ‘ए.एन.एम.’चे शिक्षण पूर्ण करत असल्याचे महाराष्ट्र राज्य खासगी नर्सिंग स्कूल अ‍ॅण्ड मॅनेजमेंट असोसिएशनचे सचिव शंकर आडसूळ यांनी सांगितले. 

यंदाही विद्यार्थ्यांना मिळणार दोन मोफत गणवेश...पण नियम मात्र बदलला...

आरोग्य संस्थेत ‘ए.एन.एम.’ची गरज 
‘ए.एन.एम.’ नर्स ही शासकीय आरोग्य सेवेचा शेवटचा घटक आहे. आरोग्य सेवा बळकट करताना ग्रामीण, शहरी आरोग्याच्या बाबतीत सक्षम बनवायचे असल्यास असंख्य ‘ए.एन.एम.’ची आरोग्य संस्थेत गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) सेंटरमध्ये साधारण ५ ते ७ ‘ए.एन.एम.’ नर्स कार्यरत आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार २७ ‘ए.एन.एम.’ नर्सची प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५०० व्यक्तींमागे एका ‘ए.एन.एम.’ नर्सची गरज आहे. यानुसार आपल्याकडे २००० रुग्णांमागे एकही ‘ए.एन.एम’ नर्स नाही. भविष्यातील गरजेचा विचार केल्यास या क्षेत्रात करिअर करण्याची संधी असल्याचे संस्थाचालक विनोद गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com