घरात इंटरनेटला स्पीड मिळत नाही का? हा उपाय करा...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः घराघरात मोबाईलचे मोबाईल इंटरनेटचे युजर्स वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बऱ्याच वेळा घराच्या बाहेर आले की इंटरनेटला स्पीड मिळतो; मात्र घरात गेलं की एक १५ ते २० केबीची फाईलही डाऊनलोड होत नाही. अशा वेळी ऑनलाईनच्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्तींचे अनेक महत्वाचे कामे खोळंबून राहतात. 

घरात मोबाईलला इंटरनेट स्पीड मिळण्यासाठी मार्केटमध्ये नेटवर्क बूस्टर मिळतात. या इंटरनेट बूस्टरचा वापर करुन आपण घरात बसून ऑनलाईनची सर्व कामे सहज करु शकतो. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे नेटवर्क बूस्टर मिळतात. या नेटवर्क बूस्टरमध्ये तीन महत्त्वाचे भाग आहेत. हे युनिट साधारण एका छोट्या बॉक्ससारखे असते. ते घराच्या छतावर लावावे लागते. त्यानंतर हे एम्लिफायर युनिट आपल्या परीसरातील मोबाईल टॉवरवरुन सिग्नल रिसिव्ह करते. या एम्लिफायर युनिटची एक केबल घरातील मुख्य युनिट म्हणजे इनडोअर युनिटला जोडलेली असते.

आऊटडोअर युनिटच्या माध्यमातून आलेले सिग्नल काही पटीने एम्लिफायरकरुन ते सिग्नल इनडोअर युनिला पाठवले जाते. इनडोअर युनिट एम्लिफायरकडून आलेले सिग्नल घरात पसरवते. त्यामुळे आपल्याला घरात बसून मोठ्या प्रमाणात इंटरनेट स्पीड मिळायला सुरुवात होते. हे युनिट एक प्रकारे वायफाईसारखे आहे. या युनिटचे वेगवेगळे प्रकार आहेत. एअरटेल, जिओ, आयडीया, वोडाफोन, बीएसएनएल अशा वेगवेगळ्या नेटवर्क कंपनीला सपोर्ट करणारे वेगवेगळे युनिट बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येक युनिटची त्या-त्या नेटवर्क कंपनीनुसार वेगवेगळ्या किमती आहे. साधारणः १५ हजार रुपयांपर्यंतचे युनिट सर्व नेटवर्क कंपन्यांना सपोर्ट करते.

नेटवर्क मिळण्यासाठी या युनिटचा प्रॉपर सेटअप करावा लागतो. मोठमोठे कॉर्पोरेट ऑफीस, बिल्डिंगमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, अशा ठिकाणी या नेटवर्क बूस्टरचा वापर केला जातो. मार्केटमध्ये पाचशे ते हजार रुपयांपर्यंत सिग्नल बूस्टर मिळतात, पंरतू हे बुस्टर काहीही कामाचे नसतात. तसेच दहा ते बारा हजाराच्या मोबाईलसाठी घरात १५ हजारांचे बूस्टर युनिट घेणं सर्वसामान्य मानसाला परवडणारे नाही. पण ज्यांचे काम काम इंटरनेट ऑनलाईन चालते, अशा लोकांना या बूस्टरचा मोठा फायदा होतो. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

हेही करुन पहा... 
- मोबाईलमधील कॅचेस फाईल डिलिट करा... 
- सोशल मिडीयाच्या माध्यमातून नको असलेले व्हिडीओ, फोटो, फाईड डिलीट करा. 
- महत्वाचे किंवा गरजेचे ॲप्स फोनमध्ये ठेवा 
- आवश्यकता असेल तेव्हांच इंटरनेट चालू करा; अन्यथा बंद ठेवा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com