esakal | Corona Vaccination: लसीकरणानंतर किरकोळ त्रास; काही जणांना थंडीताप, मळमळ
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

देशभरात शनिवारी (ता. १७) लसीकरण मोहीम झाली. एक हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार होते.

Corona Vaccination: लसीकरणानंतर किरकोळ त्रास; काही जणांना थंडीताप, मळमळ

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: लसीकरणानंतर थंडीताप, अंगदुखीसह मळमळ, इंजेक्शनच्या जागी खाज येणे व इतर किरकोळ त्रास लस घेणाऱ्यांना झाला. मात्र, हा त्रास लस निर्मात्याकडून सांगण्यात आलेलाच होता. तो प्रमाणापेक्षा सुमारे तीन ते चार टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे हा त्रास गृहित धरावाच लागणार होता.

देशभरात शनिवारी (ता. १७) लसीकरण मोहीम झाली. एक हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार होते. को-विन ॲपच्या तांत्रिक बिघाडामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ३६.३ टक्के आरोग्य योद्ध्यांचे लसीकरण झाले नाही. एकूण ६४.७ टक्के आरोग्य योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण झाले. एकूण ६४७ पैकी औरंगाबाद जिल्ह्यात २० ते २२ जणांना लसीकरणानंतर किरकोळ त्रास जाणवला.

Corona Updates: औरंगाबादेत ३८ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४४ हजार ९८३ कोरोनामुक्त

शनिवारी लसीकरण करण्‍यात आले. त्यानंतर आता मराठवाड्यात लस घेतलेल्या कुणाला काही त्रास आहे का याबाबत आमचे सर्वेक्षण सुरू आहे.
- डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक.

लसनिर्मात्यांनी लसीकरणानंतर दहा टक्के लोकांना किरकोळ त्रास जाणवू शकतो असे सांगितले होते. मात्र, महापालिका व जिल्ह्यात झालेल्या लसीकरणात सहा ते सात टक्के लोकांना त्रास जाणवला. महापालिका क्षेत्रात लस घेतलेल्यांना थंडी वाजून येणे, अंगदुखी, मळमळ व ताप आदी त्रास जाणवला. परंतु, तो अत्यल्प होता, तसेच दहा टक्के लोकांना त्रास होऊ शकतो असे आधीच सांगण्यात आले होते त्यापेक्षाही कमी जणांना त्रास जाणवला आहे. आमच्याकडे एकत्रित आकडे यायचे आहेत असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

"जिल्‍ह्यात २० ते २२ जणांना लसीकरणानंतर किरकोळ त्रास झाला. यात डोकेदुखी, मळमळ, उलटी, जेवण न जाणे, थंडीताप, इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी खाज येणे असा त्रास दिसून आला. इतर लस घेतानाही हा त्रास जाणवू शकतो. लसीकरणानंतर मात्र कुणाला औरंगाबादेतील रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही."
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक. औरंगाबाद


 

(edited by- pramod sarawale) 

loading image