esakal | 'मतदारसंघात 100 टक्के लसीकरण झाल्याशिवाय मुंबईला जाणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

याप्रसंगी बोलताना सत्तार म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असून त्याला रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे

'मतदारसंघात 100 टक्के लसीकरण झाल्याशिवाय मुंबईला जाणार नाही'

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (औरंगाबाद): कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात सिल्लोड व सोयगाव तालुका जिल्ह्यात सर्वात मागे होता. नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सिल्लोड तालुक्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने जम्बो लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या या कार्यक्रमाचा सिल्लोड येथे गुरुवार (ता.02) रोजी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

याप्रसंगी बोलताना सत्तार म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असून त्याला रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. लसीच्या संदर्भात अफवा पसरविण्यात येत आहे. लस सुरक्षित असून, मी नागरिकांना लस घेण्यासाठी विनवणी करीत आहे. दोन्ही लस घेणाऱ्यांनाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. महामारीचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत पण यासाठी लस घ्या. जगातील परिस्थिती बघता हज यात्रेस मक्का मदिना येथेही लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय त्या देशात पाय ठेवू देणार नाही. मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा लस घेतल्याशिवाय प्रवेश देणार नाही. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सी.पी.त्रिपाठी यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा: रूग्णवाहिकेच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना

एकाच दिवशी 120 केंद्रांवर लसीकरण-

लसीकरणाचा वेग वाढवून 50 हजार लसीचे डोस नागरीकांना देण्यासाठी सिल्लोड शहरात 50 केंद्रांवर तर तालुक्यातील ग्रामीण भागात 70 केंद्रांवर एकाच वेळी लसीकरण सुरू करण्यात आले.

राज्यमंत्र्यांचे आवाहन-

लस घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी या लसीवर विश्वास ठेवून लस घेण्याचे आवाहन सत्तार यांनी केले. तसेच यामध्ये राजकारण न आणता सर्वधर्मियांनी लस घेण्यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरूंना देखील विनंती करीत त्यांनी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन सत्तार यांनी केले. तसेच मतदारसंघात 100 टक्के लसीकरण झाल्याशिवाय मुंबईला जाणार नसल्याचे सत्तार म्हणाले.

loading image
go to top