Aurangbad : शंभर टक्के उद्दिष्टाला मानसिकतेचा अडसर; राजेश टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad : शंभर टक्के उद्दिष्टाला मानसिकतेचा अडसर; राजेश टोपे
Aurangbad : शंभर टक्के उद्दिष्टाला मानसिकतेचा अडसर; राजेश टोपे

Aurangabad : शंभर टक्के उद्दिष्टाला मानसिकतेचा अडसर; राजेश टोपे

औरंगाबाद : कोविडचा संसर्ग तूर्तास आटोक्यात असल्याने लोक निर्धास्त झाले आहेत. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीकरणाला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे नोव्हेंबर अखेर कोविड लसीचा पहिला डोस पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असताना औरंगाबादेतून फारसा प्रतिसाद लाभताना दिसत नाही. शनिवारी (ता.२०) पर्यंत पहिला डोस ६२.६३ टक्के तर दुसरा डोस केवळ २६.९० टक्के नागरिकांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

राज्यात कोरोना प्रतिबंधक पहिला डोस ८० टक्के लोकांना दिला गेला. नोव्हेंबरअखेरपर्यंत हे प्रमाण शंभर टक्के व्हावे हे उद्दिष्ट राज्य शासनाचे असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही औरंगाबाद लसीकरणात मागे असल्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर औरंगाबादेत लसीकरण मोहिमेला गती दिली गेली व नागरिकांच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर गंडांतर आणले गेले. पर्यायाने लसीकरणाला गर्दी होत आहे. तरीही हवी तेवढी प्रगती लसीकरण मोहिमेला प्राप्त झाली नाही. केवळ २६.९० टक्के लोकांनी दुसरा व ६२. ६३ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला. हे प्रमाण शंभर टक्के व उद्दिष्ट सफल होण्यासाठी लाभार्थी व त्यांची मानसिकता हेच महत्त्वाचे कारण दिसून येत आहे. त्यासाठी मानसिकता बदलून जागृती घडविणेही आवश्‍यक आहे.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

"लसीकरणाबाबत काही गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांना सातत्याने महत्त्व समजून सांगण्याची गरज, हा महत्त्वाचा भाग आहे. केंद्राची ‘घर घर दस्तक’ व ‘मिशन कवचकुंडल’च्या माध्यमातून लोकजागृती करीत आहोत. महसूल, ग्रामविकास, शिक्षण विभागाची मदत त्यासाठी घेत आहोत."

- राजेश टोपे, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग

महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या माहितीनुसार

एकूण लसीकरण : १०,५४,८३,४२५

पहिला डोस : ७,४५,०३,१८५

दुसरा डोस : ३,५०,३०,२४०

औरंगाबाद जिल्हा ( जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार )

पहिला डोस : २०,१९,६७५ (६२.६३ टक्के)

शहर : ६४.४२,

ग्रामीण : ६१.७६ टक्के

दुसरा डोस : ८,६७,३८१ (२६.९० टक्के)

शहर : ३८.६९

ग्रामीण : २१.१६ टक्के

loading image
go to top