esakal | आता ही लढाई माझ्या एकटीची नव्हे..असं कोण म्हणालं
sakal

बोलून बातमी शोधा

आता ही लढाई माझ्या एकटीची नव्हे..असं कोण म्हणालं

औषधी घेतल्यानंतर ही ११ मार्च रोजी थंडी, तापासह श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे ब्लड टेस्ट करण्यात आली. डॉक्टरांनी सल्ला दिल्याने ॲडमिट झाले. माझे स्वॅब नमुने हे १३ मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर मनात भीती वाटली; मात्र डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझी मोठी काळजी घेतली. या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी सुरू झाली होती. माझ्या सहकाऱ्यांना देखील संशयित म्हणून ॲडमिट करण्यात आले होते.

आता ही लढाई माझ्या एकटीची नव्हे..असं कोण म्हणालं

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः कोरोनासारख्या व्हायरसची मला बाधा होईल, असे कधीच वाटले नव्हते. शेवटी जीवनमरणाच्या लढाईत मी यशस्वी झाले. आता ही लढाई माझ्या एकटीची नव्हे, तर ती सर्वांनी मिळून लढायची आहे, असे मत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणाऱ्या प्राध्यापक महिलेने व्यक्त केले आहे.

उपचारानंतर ५९ वर्षीय प्राध्यापिकेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोमवारी (ता. २३) दुपारी सुटी देण्यात आली. सुटी होण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनीही प्राध्यापिकेची भेट घेतली. 
खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. सुटी मिळाल्यानंतर त्या म्हणाल्या, की मी मोठ्या आनंदाने सुनेसोबत रशियाची टूर प्लॅन केली होती.

हेही वाचा- होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरासमोर लागणार फलक

कोरोनामुळे टूर रद्द करण्याचा विचार मनात आला होता; मात्र त्या काळात कोरोनाची इतकी भीती नव्हती. रशियामध्ये झालेली टूर ही अविस्मरणीय राहिली. परत येताना अनेक ठिकाणी आमची तपासणी करण्यात येत होती. दिल्ली विमानतळावर आमची तपासणी झाली. त्यानंतर औरंगाबादेत तीन मार्चला परतले. दुसऱ्या दिवशी चार मार्च रोजी महाविद्यालयात रुजू झाले. सात मार्चपर्यंत कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यानंतर माझ्या डॉक्टर असलेल्या मुलाशी संपर्क केला. तेव्हा त्याने काही औषधी घेण्यास सांगितले. 

औषधी घेतल्यानंतर ही ११ मार्च रोजी थंडी, तापासह श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे ब्लड टेस्ट करण्यात आली. डॉक्टरांनी सल्ला दिल्याने ॲडमिट झाले. माझे स्वॅब नमुने हे १३ मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर मनात भीती वाटली; मात्र डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझी मोठी काळजी घेतली.

हेही वाचा- कोरोनाची धास्ती 59 हजार प्रवाशांची तपासणी

या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी सुरू झाली होती. माझ्या सहकाऱ्यांना देखील संशयित म्हणून ॲडमिट करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. अरुण गवळी यांनी उपचार केले. 

उपचारादरम्यान विलगीकरण कक्षात असल्याने मला एकटेपणा जाणवू नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. अतिशय स्ट्राँग औषधी दिल्या जात असल्याने त्रासही जाणवला; मात्र ही लढाई मला जिंकता आली. यामध्ये अनेकांचे प्रयत्न आहेत. आता सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. 

पुढील दहा दिवस ‘होम क्वारंटाइन’ 

शहरातील ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेस सुटी झालेली असली तरी त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना पुढील दिवस थंड न खाण्याचे सांगण्यात आले. सात दिवसांनंतर पुन्हा तपासणी केली जाणार आहे.