esakal | मनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News
  • राज्य मानसशास्त्र तज्ज्ञ असोसिएशन आणि 'सकाळ सोशल फाऊंडेशन'चा उपक्रम
  • तज्ञ समुपदेशकाद्वारे ताणतणाव, चिंता व्यवस्थापन
  • नागरिकांना फोनद्वारे शास्त्रशुद्ध समुपदेशन

मनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते. 

नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन 'सकाळ सोशल फाऊंडेशन' आणि राज्य मानसशास्त्र तज्ज्ञ असोसिएशनतर्फे ताणतणाव, तसेच चिंतामुक्तीसाठी नागरिकांना दूरध्वनीद्वारे शास्त्रशुद्ध समुपदेशन केले जाणार आहे. 

यामध्ये नागरिक सकाळई १० ते सायंकाळी ५ या वेळेत समुपदेशकांना कॉल करून त्यांच्या मनातील शंका विचारू शकतात. तसेच कोरोना आजारातून पूर्णतः  बऱ्या झालेल्या, भीती असलेल्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांनाही विनाशुल्क, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे यांनी सांगितले आहे. 

जिल्हानिहाय समुपदेशक आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक

औरंगाबाद - डॉ संदीप सिसोदे - 9890054518
जालना - किशोर आघाम - 9766363888
बीड - अनुराधा प्रकाश - 9421480727
परभणी - स्वाती देशपांडे - 9511842989
नांदेड - अमोल निंबाळकर - 9503035011
लातूर - मनोज रुपणार - 9922363674
उस्मानाबाद - लक्ष्मण शेळके - 9860353015
हिंगोली - एम. ए. अब्दुल - 7875322731
वाशीम - मंगेश भाग्यवंत - 8007882244
यवतमाळ - सचिन साकरकर - 8275558910
भंडारा - कमलेश पिसाळकर - 9850412905
चंद्रपूर - शुभांगी झाडे - 8411983400
गोंदिया - अमित वाग्दे - 9923654513
गडचिरोली - शशिकान्त शंकरपुरे - 9422809776
वर्धा - प्रशांत मेश्राम - 9960754353
नागपूर - नीता जैन - 8275225910
अमरावती - भावना पुरोहित - 9511879872
अकोला - प्रदीप इंगोले - 9028361135
बुलढाणा - ज्ञानेश्वर मुळे - 9271708726
जळगाव - नितीन विसपुते - 9561602333
धुळे - वैशाली पाटील - 7588736046
नंदूरबार - पवन डोंगरे - 8007270019
नाशिक - रोहिणी अचवल - 7588704541
ठाणे - असिया चिरमुले - 8082537770
मुंबई - प्राची पटेल - 8169239307
नवी मुंबई - विशाल गाणार - 9833784373
रत्नागिरी - सचिन सारोळकर - 9422429899
सिंधुदुर्ग - नारायण परब - 7057133670
रायगड - पंकज मोरे - 9833627197
अहमदनगर - अमृता साठे - 7218808719
पुणे - पल्लवी इनामदार - 7276699619
पिंपरी चिंचवड - स्मिता गोसावी - 9011094376
सातारा - संदीप शिंदे - 9822686815
कोल्हापूर - कालिदास पाटील - 9422627571
सांगली - अजित पाटील - 9850583688
सोलापूर - अलका काकडे - 9850890681

loading image