
छत्रपती संभाजीनगर : तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पतसंस्थेत एफडी करण्यास सांगून ती एफडी परस्पर मोडून ६५ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणात पतसंस्थेचा व्यवस्थापक रत्नाकर जोशी याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी नामंजूर केला.