Crop Insurance
sakal
छत्रपती संभाजीनगर
Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत
High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला थकीत पीकविमा नुकसानभरपाईचे १९० कोटी रुपये चार आठवड्यांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसानभरपाई लवकर मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून थकीत असलेल्या पीकविमा नुकसानभरपाई प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. राज्य सरकारला १९० कोटी रुपये चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती आर.जी. अवचट व न्यायमूर्ती अबासाहेब शिंदे यांनी दिले आहेत.

