दिलासादायक! औरंगाबादमध्ये एप्रिलच्या तुलनेत घटले तब्बल पाच हजार रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

दिलासादायक! औरंगाबादमध्ये एप्रिलच्या तुलनेत घटले तब्बल पाच हजार रुग्ण

औरंगाबाद: शहरात कोरोना संसर्गाची (corona infection) दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे. एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या पाच हजाराने कमी म्हणजेच सुमारे पावणे नऊ हजार एवढी आढळून आली आहे. दरम्यान मृतांच्या संख्या कायम आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात जिल्ह्यात ३२ हजार ३१३ रुग्ण आढळून आले. पहिल्या दहा दिवसांतील रुग्णांची संख्या ४,०७३ होती. एप्रिल महिन्यात तब्बल ४१,५२८ रुग्ण आढळून आले. पहिल्या दहा दिवसांतच जिल्ह्यात १४,७३३ बाधित आढळले. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या दहा दिवसांपेक्षा कमी म्हणजेच ८,८१७ नवीन रुग्ण आढळले आहेत (covid 19 cases in first 10 days of month aurangabad decreased).

हेही वाचा: International Nurses Day: अनाथ रूपाली बनली कोरोना रुग्णांसाठी आधार

प्राप्त अहवालानुसार एक ते १० मे दरम्यान जिल्ह्यात आढळलेल्या ८,८१७ बाधितांमध्ये शहरातील रुग्णांची संख्या कमी असून ग्रामीणमधील संख्या अधिकच आहे. या दिवसांत शहरात ३,३८५ तर ग्रामीणमध्ये ५,४३२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. मार्चमध्ये पहिल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ४३ बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यातुलनेत एप्रिलच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत तब्बल २८२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दहा दिवसांत २६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नसल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: 'कोरोनाकाळात काळजीपोटी आई माझ्यापासून दूर' परिचारिकेच्या मुलीची खंत

गेल्या तीन महिन्यातील पहिल्या दहा दिवसांतील रुग्ण
मार्च - ४,०७३
एप्रिल - १४,७३८
मे - ८,८१७

Web Title: Covid 19 Cases In First 10 Days Of Month Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad News
go to top