'कोरोनाकाळात काळजीपोटी आई माझ्यापासून दूर' परिचारिकेच्या मुलीची खंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nurse day

'कोरोनाकाळात काळजीपोटी आई माझ्यापासून दूर' परिचारिकेच्या मुलीची खंत

उमरगा (उस्मानाबाद): गेल्या चौदा महिन्यांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची देखभाल करणाऱ्या परिचारिकांचे कार्य लाखमोलाचे आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस अन् रात्र रुग्णसेवेत केवळ नौकरी म्हणुन नव्हे तर संकट काळात सामाजिक बांधिलकी म्हणून परिचारिका काम करताहेत. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त त्यांचे कार्याचे कौतुक समाजस्तरातून व्हावे ही अपेक्षा.

उमरगा तालुक्यात एक एप्रिल २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तो वर्ष समाप्तीनंतरही सुरूच आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी मोठी जोखीमेतून काम केले आहे आणि सध्या अविरत सुरूच आहे. त्यात परिचारिका यांचे काम लाखमोलाचे आहे. कुटुंबाची जबाबदारी पेलत रुग्ण सेवा करण्यासाठी कोरोनाच्या काळात त्यांना कटू प्रसंगाला सामोरे जावे लागते. दरम्यान गेल्या वर्षभरात रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचारी असे ४२ जणांचा कोरोनाचा संसर्ग झाला ; तरीही रुग्णसेवेसाठी सर्वांचे प्रयत्न राहिले आहेत.

हेही वाचा: Corona Vaccination: कळंबमध्ये लसीकरणासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी

परिचारिकेच्या मुलीने व्यक्त केले आईचे कौतूक आणि खंतही !

उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका राखी वाले - डिगुळे  या कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला तेंव्हापासून रुग्ण सेवेत आहे. संसर्गाच्या भीतीने कुटुंबातील सदस्यापासून दूर राहत लांबूनच मायेची उब देणाऱ्या अधिपरिचारिका असलेल्या आपल्या आईबद्दल मुलीने भावना व्यक्त केल्या.

मुलगी श्रावणी डिगुळे म्हणते, परिचारीका या फक्त रुग्णसेवकच नसून आई, बहीण, बायको, मुलगीसुद्धा आहेत. पण माझ्या घरात सध्या परिचारीकाच आहे आणि यात मला अजिबात खंत वाटत नाही. जेव्हा उमरग्यात पहिला रुग्ण सापडला, तो बरा झाला त्यानंतर असंख्य रुग्ण  बरे होताना व आनंदाने रूग्णालयाबाहेर पडताना आईने पाहिले आहे.  बहुजन वस्तीगृहात सर्वप्रथम सुरु करण्यात आलेल्या कोविडकेअर  सेंटरमध्ये  बाहेरगावाहून आलेले क्वारंटाईन झालेले रूग्ण राहत होते. त्या रुग्णांची जवळून सेवा देण्याचे काम आईने केले आहे. दररोज सकाळी भजन, संगीत लावत तसेच प्राणायम, योगा करून रुग्णाला प्रसन्न ठेवायचा प्रयत्नही तिने केला आहे.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत; मृत्यूदरही घटला

आईने केलेल्या रुग्णसेवेचा आम्हाला खुप अभिमान आहे आणि एकाच गोष्टीच वाईट पण वाटते की ती आमच्यापासून दुरावली ते पण आमच्याच काळजीपोटी. जेव्हापासून कोरोनाचा शिरकाव उमरग्यात झालाय, तेव्हापासून आईने एकदाही कुशीत घेतलं नाही घेतल नाही. तिची खूप इच्छा असेल पण या कोरोनामुळे हे काही शक्य नाही. ही अवस्था सर्व लेकरांची झालीय. आई जेवढी बाहेर कठोर वागते किंवा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना घाबरू नका म्हणते, धैर्य देते. पण घरी लेकरांना थोडासा खोकला, सर्दी आला तरी ती घाबरून जाते.

Web Title: International Nurses Day Covid 19 Corona Osmanabad News In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top