esakal | मोजा पैसे... घ्या लस! सरकारी केंद्रे ओस; खासगी रुग्णालयांकडे ३८ हजारचा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

मोजा पैसे... घ्या लस! सरकारी केंद्रे ओस; खासगी रुग्णालयांकडे ३८ हजारचा साठा

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणाची गती वाढवावी लागेल, अशा सूचना वारंवार शासनाकडून दिल्या जात आहेत. मात्र, केंद्र शासन लसींचा साठाच देत नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांकडे मात्र तब्बल ३८ हजार कोविशिल्ड लसींचा साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी प्रशासनातर्फे केली जात आहे. १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे गतीने लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शासनातर्फे लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश दिले जात आहेत; पण दुसरीकडे लसीच मिळत नसल्याने आठवड्यातले एक-दोन दिवसच लसीकरण होत असून, उर्वरित दिवशी केंद्र बंद राहत आहेत. नागरिक लस कधी येणार? याची विचारणा करण्यासाठी केंद्रावर चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: आता Netflix च्या ग्राहकांना 'Video games' चाही आनंद घेता येणार

एकीकडे सरकारी लसीकरण केंद्र बंद असताना खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करून ती नागरिकांना देण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालये नागरिकांकडून पैसे घेऊन लस देत आहेत. त्यासाठीचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. मोफत लसीसाठी लागणाऱ्या रांगा व वारंवार निर्माण होणारा तुटवडा यामुळे अनेक नागरिक पैसे मोजून लस घेत आहेत.

शहरातील ३८ रुग्णालयांना परवानगी
महापालिकेने शहरातील ३८ रुग्णालयांना विकत लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. यातील २४ रुग्णालये महात्मा फुले आरोग्य योजना लागू असलेले आहेत तर उर्वरित या योजनेबाहेरचे आहेत. सध्या शहरातील नऊ रुग्णालयांनीच ८९ हजार ९७० लसी (सोमवारच्या अहवालानुसार) खरेदी केल्या आहेत. याठिकाणी आत्तापर्यंत ५१ हजार जणांनी विकत लस घेतली आहे. एकट्या बजाज रुग्णालयाकडे २५ हजार १० लसी शिल्लक आहेत. २०० रुपयांना लसीचा डोस याठिकाणी दिला जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

हेही वाचा: Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ

असे आहेत दर-
शासनाने खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्ड ६३०, कोव्हॅक्सिन १२६० व स्पुटनिक ९४८ रुपयांना उपलब्ध करून दिली आहे. यावर सर्व्हिस चार्ज म्हणून खासगी हॉस्पिटल १५० रुपये आकारू शकतात.

शहरात सुमारे साडेअकरा लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे महापालिकेला उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने शासनाकडे लसींची मागणी नोंदविली आहे. आठवड्याला किमान एक लाख लस मिळणे अपेक्षित आहे. पण लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी खासगी रुग्णालयात लस घ्यावी.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका
.

कमलनयन बजाज हॉस्पीटल व बजाज विहार पंढरपूर येथे नागरिकांना नाममात्र २०० रुपयात मर्यातीद स्वरूपात कोविशिल्ड लस दिली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, हा उद्देश आहे.
-डॉ. नताशा वर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी कमलनयन बजाज हॉस्पिटल.

loading image