esakal | Corona Update : औरंगाबादेत आढळले ३६ रुग्ण, जिल्ह्यात सध्या ३३३ कोरोनाबाधितांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

सध्या ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी ५५ जणांना सुटी देण्यात आली.

Corona Update : औरंगाबादेत आढळले ३६ रुग्ण, जिल्ह्यात सध्या ३३३ कोरोनाबाधितांवर उपचार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) दिवसभरात ३६ कोरोनाबाधित आढळले. रुग्णांची संख्या ४६ हजार ४३४ झाली. सध्या ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी ५५ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४४ हजार ८७८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.


शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : उल्कानगरी (२), नाथपुरम (२), सातारा परिसर (१), शहागंज (१), पांडव कॉर्नर (१), एन-९ सिडको (१), एन-७ पोलीस स्टेशन (१), एन-६ सिडको (१), रंगार गल्ली (१), सातारा परिसर (१), पदमपुरा (१), उस्मानपुरा (१), बीड बायपास (२), बजाजनगर (१), अन्य (१५).

ग्रामीण भागातील बाधित : नागद (१), फुलंब्री (१), अन्य (०२)

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

मराठवाड्यात ९ मृत्यू
मराठवाड्यात कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात बीडमध्ये तीन, जालन्यात दोन, लातूर, औरंगाबाद, नांदेड परभणीत प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हानिहाय आज आढळले नवे कोरोनाबाधित रुग्ण असेः लातूर ४७, जालना ९, बीड ३५, नांदेड ३४, हिंगोली ६, परभणी २२.

Edited - Ganesh Pitekar