esakal | Corona Updates : जालन्यात २७० जण कोरोनामुक्त, नवीन २३२ बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

corona condition in Jalna

सध्या जिल्ह्यात तीन हजार ६६४ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona Updates : जालन्यात २७० जण कोरोनामुक्त, नवीन २३२ बाधित

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात (Jalna Corona Updates) मंगळवारी (ता.२५) डॉक्टरांच्या उपचारामुळे २७० जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. विविध भागातील २३२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे मृत्यू सुरू आहेत. मंगळवारी पुन्हा १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९९२ जणांचा कोरोनामुळे (Corona) जीव गेला आहे. तसेच नव्याने २३२ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जालना शहरात १५, जालना तालुक्यात नऊ रूग्ण आढळून आले. तर मंठा शहरात चार व तालुक्यात दहा, परतूर शहरात १५ व तालुक्यात दहा, घनसावंगी शहरात एक व तालुक्यात आठ, अंबड शहरात १९ व तालुक्यात ३५, बदनापूर शहरात तीन व तालुक्यात ३४, जाफराबाद शहरात पाच व तालुक्यात १५, भोकरदन शहरात सात व तालुक्यात २६ व इतर जिल्ह्यातील १८ जणांचे कोरोना चाचणी (Corona Test) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५९ हजार ५२२ कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. दरम्यान, २७० रूग्ण मंगळवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५४ हजार ८६६ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात तीन हजार ६६४ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (Covid New 232 Cases Reported In Jalna)

हेही वाचा: 'माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय'

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आकडेवारी

एकूण बाधित : ५९ हजार ५२२

एकूण कोरोनामुक्त : ५४ हजार ८६६

एकूण मृत्यू : ९९२

उपचार सुरू : ३ हजार ६६४