'क्यू आर कोड’च्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक आरोग्य शिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Preventive Health Education through QR Code
'क्यू आर कोड’च्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक आरोग्य शिक्षण

'क्यू आर कोड’च्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक आरोग्य शिक्षण

औरंगाबाद : राज्य आरोग्य शिक्षण (State Health Education) व संपर्क विभाग पुणे यांनी कोविड (Covid-19) प्रतिबंधासाठी कोविड अनुरूप योग्य वर्तन व लसीकरण (Vaccination) तसेच घ्यावयाची काळजी याबाबत सर्व आरोग्यविषयक शिक्षण साहित्य एका ‘क्यूआर कोड’ (QR code) व लिंक च्या माध्यमातून राज्यातील जनतेला उपलब्ध करून दिले आहे.

हेही वाचा: Pune : सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग; १३ दुचाकींसह २ रिक्षा खाक

कोविड संबंधित एकूण ३३ विषयावरिल विविध प्रकारचे साहित्य केंद्र शासन, आरोग्य संघटना, युनिसेफ यांच्या तज्ञांच्या सहकार्याने तयार केले आहे. या विविध साहित्याचा संच ‘क्यु आर कोड’ व लिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सर्व साहित्य ‘क्यू आर कोड’च्या माध्यमातून एका क्लिकद्वारे सहज मोबाईलद्वारे प्रत्येक नागरिकाला उपलब्ध झाले आहे. एवढे मोठे साहित्य सर्वांना पुरवणे हे आव्हान ‘क्यू आर कोड’ च्या माध्यमातून व नवतंत्रज्ञाना द्वारे समाज माध्यमाच्या माध्यमातून शक्य झाले आहे.

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

यामुळे प्रत्येक आरोग्य कार्यकर्ता, संस्था, नागरिक जनजागृतीसाठी साहित्य आपापल्या जिल्ह्यात वापर करीत आहे. त्यामुळे व्यापक प्रमाणावर लोक जागृत होऊन कोविड प्रतिबंध करण्यासाठी काळजी घेतील व घाबरून जाणार नाहीत. प्रत्येक कुटुंबासाठी हे साहित्य उपयोगी असून समाजाला त्याचा उपयोग होईल. प्रत्येकाने हा संदेश देऊन साहित्य मोबाईलमध्ये अवश्य ठेवावे व जागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top