Cricket Betting : क्रिकेटच्या ‘रन’संग्रामावर कोट्यवधींचा सट्टा; बेटिंगचा रेट असा...

सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींसोबत सट्टेबाजारातील सटोडियांचे या सामन्याकडेच लक्ष
Cricket Betting
Cricket BettingSakal

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर : सध्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार सुरू आहे. आतापर्यंतच्या गुणतालिकेत समान गुण मिळालेल्या भारत आणि न्यूझिलंड या दोन्ही तुल्यबळ संघात रविवारी (ता. २२) सामना रंगला. सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींसोबत सट्टेबाजारातील सटोडियांचे या सामन्याकडेच लक्ष होते.

शहरात या सामन्या दरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण सामन्यातील टॉसपासून ते शेवटच्या क्षणांपर्यंतचा सट्टेबाजारातील ‘सकाळ’चा हा अपडेट स्पेशल रिपोर्ट.

सट्टा बाजार म्हणजे नेमके काय?

कोणत्याही हरण्या किंवा जिंकण्याच्या गोष्टींवर पैसा लावणे म्हणजेच साधारण भाषेत याला शर्यत किंवा बेटिंग म्हणता येईल. मात्र, ज्या बेटिंगमध्ये लावलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मिळण्याचे आमिष असते त्याला सट्टा म्हणतात. सट्टेबाजार जगात सर्वत्र पसरलेला आहे. क्रिकेट सामना, हॉर्स रायडिंग ते अन्य खेळांवरही पैसा लावण्यात येतो.

भारतात प्रामुख्याने क्रिकेट या खेळावर सट्टा लावण्यात येतो. यामध्ये सट्टेबाज त्या खेळातील खेळाडू, एकूण किती रन बनतील, सेशननुसार किती रन होतील, टॉस कोण जिंकणार आदी भाव ठरवतात. जे सट्टेबाज या सटोडियाकडे खाते उघडतात, त्यांना या भावाची माहिती दिल्यानंतर सट्टा खेळणारे त्या भावावर पैसे लावून सट्टेबाजारात पैसा लावतात.

इंटरनेटमुळे बाजार सोपा

काही वर्षांपूर्वी सट्टेबाजारात अनोळखी व्यक्तीला थेट प्रवेश नव्हता. पूर्वी जी व्यक्ती सट्टेबाजार खेळात आहे, तिने हमी घेतल्यानंतर नवीन व्यक्तीची सट्टेबाजारात एंट्री होत होती. यासाठी सट्टे बाजारात बनावट नावाने खाते उघडून ठरावीक रक्कम अनामत म्हणून भरावी लागत होती. या रक्कमेतून सट्टा लावला जात असे.

हरला तर सट्टेबाजाला रक्कम देणे आणि जिंकल्यास त्याच्याकडून रक्कम मिळणे हा या बाजारातील अलिखित नियम आहे. तो कसोशीने पाळण्यात येतो. नवीन पद्धतीमध्ये आता इंटरनेटचा वापर होत आहे.

यामध्ये शहरात नांदेड, नागपूर, अहमदाबाद, मुंबई येथून बुकी सट्ट्याची लाइन चालवत आहे. या मंडळींनी इंटरनेटवर स्वतःचे बेटिंग ॲप तयार केले. आता या ॲपवरच कस्टमर आयडी तयार करून ऑनलाइन सट्टा खेळला जात आहे. फक्त या खेळात मोठ्या रक्कमेचे व्यवहार मात्र रोखीने होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत सुरुवातीपासून फेव्हरेट

रविवारी झालेल्या सामान्यात सुरुवातीपासून सर्वच सट्टेबाजार भारतचा संघ हा फेव्हरेट संघ म्हणून होता. अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडू पूर्वीच भारताला १ रुपयाला ४५ पैसे भाव तर न्यूझीलंडला १ रुपयाला ३.१५ पैसे भाव देण्यात आला होता. याचा अर्थ भारत जिंकू शकतो हे द्योतक मानल्या गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारत सुरुवातीपासून फेव्हरेट

रविवारी झालेल्या सामान्यात सुरुवातीपासून सर्वच सट्टेबाजार भारतचा संघ हा फेव्हरेट संघ म्हणून होता. अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडू पूर्वीच भारताला १ रुपयाला ४५ पैसे भाव तर न्यूझीलंडला १ रुपयाला ३.१५ पैसे भाव देण्यात आला होता. याचा अर्थ भारत जिंकू शकतो हे द्योतक मानल्या गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बेटिंगचा रेट असा...

पहिली इनिंग : न्यूझीलंड

ओव्हर- रन- भाव

१ ते १०- ४९-५० -४७/ ४८

ओव्हर १०-२०- ८५-८६- २६/२८

ओव्हर २०-३० -१४६-१४८- ५०/५२

ओव्हर ३०-४० -२१६-२१७ - ६१/६२

ओव्हर ४०-५०, -२८८-२८९- ५८/५९

दुसरी इनिंग : भारत

ओव्हर १-१०- ५७-५८- ४४/ ४५

ओव्हर १०-२०- ११६-११८- १५/१७

ओव्हर २०-३० -१६५-१६७- २३ / २४

ओव्हर ३०-४०- २२३-२२४ -३५/३६

ओव्हर ४०-५० -२२४-२७४- ८/९

नाणेफेकीला १,००० ला ९५० चा भाव

प्रत्येक सामन्यामध्ये नाणेफेक कोणता कर्णधार जिंकतो आणि तो काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून असते. आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सट्टेबाजारात नाणेफेक कोण जिंकणार यावर १००० रुपयाला ९५० रुपये भाव होता. जो हा भाव जिंकणार त्याला १००० ला ९५० लागून भेटणार होते तर नाणेफेक हरणाऱ्याला १००० गमवावे लागणार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com