
औरंगाबाद- जगभरात फोफावलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव औरंगाबाद शहरातही दिसून येत आहे. कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आणि एक संशयास्पद रुग्ण शहरातील रुग्णालयात उपचार घेत आहे. यात पॉझिटीव्ह रुग्णाबाबत अफवा सोशल मीडियात पसरवली गेली. त्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने कडक भूमिका घेतली आहे.
हे वाचले का? - बामुच्या कुलसचिवपदी डॉ. जयश्री सुर्यवंशी
युजर्सवर ठोस कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये असंख्य पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमुळे खरी माहिती कोणती हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातच जाणीवपूर्वक काहीजण मात्र कोरोनाशी संबंधित खोटी व चुकीची माहिती लोकांपर्यंत व्हाट्सअप, फेसबूक आणि इतर समाज माध्यमांद्वारे पसरवित आहेत. समाज माध्यमाद्वारे अशा खोट्या व लोकांमध्ये गैरसमज, अफवा पसरतील अशा पोस्ट टाकण्यात येत असतील तर अशा युजर्सवर ठोस कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला.
खबरदारी घ्यावी
अफवा पसरू नका, त्याऐवजी लोकांच्या मदतीसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. अफवा पसरणार नाहीत यासाठी आटोकाट प्रयत्न करा. व्हाट्सअप ग्रुपवर अशा अफवा पसरविल्यास व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी योग्य ती खबरदारी तात्काळ घ्यावी, असा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कोरोनाशी निगडीत एक रेग्युलेशन १४ मार्चला काढण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांनी रुग्णाशी संबंधित माहिती तसेच कोरोना व रुग्णाबाबत अफवा पसरवू नये अन्यथा अशांवर ठोस कारवाई करू, असेही आयुक्तांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात कोरोनाची एक पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. या महिला रुग्णाची प्रकृती व्यवस्थित असून रुग्ण दगावल्याबाबत खोटी व चुकीची माहिती सोशल मीडियात पसरविण्यात आली. याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. ही अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत.
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.