Crime News: मुकुंदवाडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

मुकुंदनगर भागातील १६ वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला.
Minor girl kidnapped
Minor girl kidnappedesakal

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदनगर भागातील १६ वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली संतोष भालेराव (वय १६, रा. मुकुंदनगर) असे त्या अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे.

रंजना भालेराव यांनी मुकुंदवाडी पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी अंजली हिला ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान अज्ञात कारणावरून कोणीतरी पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अंजली हिचा रंग सावळा, पाच फूट उंची, मजबूत बांधा, काळा पांढरा रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीज पॅन्ट, पायात चप्पल असून तिला मराठी, हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास मुकुंदवाडी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com