
औरंगाबाद : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ७२ गुन्हे दाखल
औरंगाबाद : शहरात पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या दोन दिवसांत ८ जणांकडून तलवार व चाकू तसेच ३६ अवैध दारू विक्रते, ८ जुगार अड्डे, ६ गुटखा विक्रेते, दुचाकीस्वार बनावट क्रमांक टाकणारे ५ आणि दोन हद्दपार गुन्हेगार पकडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ एप्रिलरोजी विविध पोलिस ठाण्याच्या पथकांनी हद्दीत कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.
अवैध देशी दारू विक्रीत २२ जण पकडले
उस्मानपुरा पोलिसांनी अनिल दादाराव आठवले, प्रवीण म्हसुजी वाहूळ, दत्ता जनार्दन बिडकर, विक्रम सोमनाथ पवार, मुकुंदवाडी भागातून संतोष नाना काळे, निखिल राजू डोंगरे, दौलताबाद भागातून शेख रईस शेख अब्दुल, सुरेश कचरू परभत, एमआयडीसी सिडको भागातून अप्पासाहेब एकनाथ सादरे, सचिन जनार्दन वडेकर, हर्सूल भागातून विनोद बाळासाहेब आढाव, राहुल गणपत मोरे, एक महिला, छावणी भागातून अजित अण्णाराव जाधव, सचिन सर्जेराव त्रिभुवन, सिटी चौक भागातून राहुलदेवसिंग सुरेंद्रसिंग गहेरवार, पुंडलिकनगर भागातून राजू त्रिंबक खाडे, कैलास कारभारी शिंदे, सिडको भागातून राजू धनाजी घोरपडे, धर्मराज सदाशिव जोशी, सातारा भागातून सुरेश गंगाधर नन्नावरे, सलीम खान शब्बीर खान, विष्णू साहेबराव हिवाळे यांना पोलिसांनी अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करताना पकडले. या कारवाईत सर्व मिळून देशीच्या ३०७ आणि विदेशी दारूच्या १० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
सहा जणांकडून चाकू, तलवार जप्त
मुकुंदवाडी पोलिसांनी अमित ऊर्फ बबुवा रामनयन चौधरी (२१, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याला तलवार बाळगताना अटक केली. तसेच राम भगवान भुसारे (१९, रा. महादेव मंदिरजवळ, मुकुंदवाडी) हा भाजीमंडईत तलवार घेऊन फिरताना त्याला पोलिसांनी गजाआड केले. यासोबतच गुन्हे शाखेच्या पथकाने स्वदेश सर्जेराव शिंदे (२५, रा. घर क्र. २१५, गल्ली क्रं. ९, संजयनगर, मुकुंदवाडी) याला तलवारीसह अटक केली. तसेच सिटी चौक पोलिसांनी चंदन अंबादास मुजमुले (२७, रा. फाजलपुरा) याला चाकू बाळगताना जेरबंद केले. तर जिन्सी पोलिसांनी जुना मोंढा येथून शेख कैफ शेख इसाक (१९, रा. संजयनगर) याच्या तलवार घेऊन फिरताना मुसक्या आवळल्या आणि सिडको पोलिसांनी मिसारवाडीच्या गल्ली क्रमांक ७ येथून एका १७ वर्षीय मुलाकडून चाकू जप्त केला.
जुगार खेळविणारे तिघे ताब्यात
सिटी चौक पोलिसांनी चंपा चौकातील हॉटेल बहारसमोर जुगार खेळविणाऱ्या नूर खान सरदार खान (६२, रा. चंपा चौक, शाहबाजर) याला पकडले. ४५० रुपये रोखसह चिट्ठ्या जप्त केल्या. तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने बायजीपुरा गल्ली क्रमांक १ येथून हमीद खान दिलावर खान (४३, रा. संजयनगर, गल्ली क्रं. १०, बायजीपुरा) याला जुगार खेळविताना ताब्यात घेतले. तसेच बेगमपुरा पोलिसांनी घाटी परिसरातील क्वार्टर जवळून अब्दुल इफ्तेखार अब्दुल गफूर (३९, रा. टीव्ही सेंटर पोलिस कॉलनी मागे) आणि शेख रफिक (रा. असेफिया कॉलनी) यांना जुगार खेळविताना रोख २ हजार १०० रुपये आणि चिट्ट्यांसह अटक केली. तर सातारा पोलिसांनी नक्षत्रवाडी येथून भारत रामभाऊ खोतकर (३६, रा. हनुमान मंदिराच्या पाठीमागे, इंदिरानगर, पंढरपूर) याला कल्याण मटका खेळविताना पकडले.
दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणारे अटकेत
दुचाकीची नोंदणी न करता बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या मुंजाजी रखमाजी कांबळे (५०, रा. इंदिरानगर, काबरानगर) याला गुन्हे शाखेच्या पथकाने सूतगिरणी चौकात दुपारी चारच्या सुमारास अटक केली. तर फायनान्सचे हप्ते चुकवण्यासाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या विलास दुर्योधन शेजूळ (रा. चांगेफळ, ता. सिंदखेडराजा) याला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हायकोर्ट सिग्नलवर पकडले.
सहा गुटखा विक्रेते अटकेत
क्रांती चौक पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील पानटपरीवर गुटखा विक्री करणाऱ्या शेख आमेर शेख अन्वर (२७, रा. नेहरू कॉलनी, नारळीबाग) आणि काकासाहेब भानुदास खळेकर (२८, रा, जुना म्हाडा कॉलनी) यांना ६ एप्रिलला रात्री साडेसातच्या सुमारास पकडले. तर सातारा पोलिसांनी कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या बाजूला असलेला टपरीचालक राजू जलाल सय्यद (३५), लखन अंभोरे, अन्साराम खांडेकर याना गुटखा विक्री करताना पकडले तर सितारा पान टपरीचा मालक पसार झाला.
Web Title: Crime Update Aurangabad 72 Cases Registered In Combing Operation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..