esakal | पिकांचे सरसकट पंचनामेIAurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

desai

पिकांचे सरसकट पंचनामे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक झाली. सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोना संसर्गात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पाच लाखांच्या रकमेचे पत्र देण्यात आले. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील पात्र लाभार्थ्यांना सनदीचे वाटप करण्यात आले. पुढे श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाजे ५६९ कोटींचा अहवाल बनविलेला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या अनेक पाणीपुरवठा योजनांची तात्काळ दुरुस्ती करावी लागणार आहे. धोकादायक तलाव दुरुस्तीसाठी २० लाखांचा निधी देण्यात येणार आहे. सहा तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढवून त्यांना ‘क’ दर्जा देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. नारेगाव येथील क्रीडा संकुलाचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.

बैठकीला रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, पोलिस आयुक्त डॉ. निखिलकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे उपस्थित होते.

नियोजन समितीतील निर्णय

  • आयुष हॉस्पिटल उभारणार

  • एकनाथ रंग मंदिरासाठी अडीच कोटी रुपये

  • भडकल गेट रस्ता दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये

  • सहा तीर्थक्षेत्राच्या दर्जामध्ये वाढ

  • स्मार्ट सिटीतून शाळांसाठी नवीन भवन

  • शाळेतील सर्व वर्ग स्मार्ट क्लास करा

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करा

यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, शेतकऱ्यांना रोहयो अंतर्गत नवीन विहीरी देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देऊ. आमदार अंबादास दानवे यांनी घृष्णेश्वर विकास आराखड्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, मराठवाडा मुक्तिसंग्रामाला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याने अमृत महोत्सव साजरा करावा अशी विनंती केली. हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी केली. अतुल सावे, रमेश बोरनारे, प्रशांत बंब, आमदार सतीश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी विनंती केली.

३६५ कोटींतून किती खर्च झाला

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, ३६५ कोटींचा १३० कोटी रुपये वितरित केले आहेत. कोरोना उपाय योजनांसाठी १०९ कोटी दिले आहेत. विकास कामांसाठी ४३ कोटींची मंजुरी दिली आहे.

loading image
go to top