सिल्लोडमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा! उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ

रांगेत उभ्या राहणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिक यांचा संयम सुटून बाचाबाची होण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे
sillod
sillodsillod

सिल्लोड (औरंगाबाद): कोविड प्रतिबंधात्मक लस (covid 19 vaccination) घेण्यासाठी नागरिकांकडून आता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गोंधळ घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यात भरीस भर म्हणून उपजिल्हा रुग्णालयात (sillod government hospital) लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत असताना नियोजनाचा अभाव देखील कारणीभूत ठरत आहे. लसीचा मर्यादित साठा तसेच संपूर्ण शहरासाठी एकच लसीकरण केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, दररोज गोंधळ सुरू आहे.

रांगा लावता लावता आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होत असताना, काही विकृत प्रवृत्तीचे नागरिक रांगाकडे कानाडोळा करून सरळ आत प्रवेश करीत आहेत. रांगेत उभ्या राहणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिक यांचा संयम सुटून बाचाबाची होण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर काम कमी अन् गोंधळ जास्त असा प्रकार घडून लसीकरण ठप्प होत आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता आरोग्य विभागाने लसीकरणाचा साठा जरी कमी प्राप्त होत असला तरी, लसीकरण केंद्रे वाढवून एका केंद्रावर होणारी गर्दी कमी करणे आवश्यक आहे.

sillod
औरंगाबादेत बालकांसाठी होणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय
covid 19
covid 19covid 19

शनिवार (ता.08) रोजी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. रुग्णालय प्रशासनाने 100 जणांचे लसीकरण करण्यासाठी कुपन वाटप करून लसीकरणाचे नियोजन केले. परंतु नागरिक रांगा लावून बसले असतांना त्यांना याची माहिती मात्र दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नागरिक आरडाओरड करू लागल्यानंतर त्यांना तोंड देण्यासाठी अधिकारी देखील हजर नव्हते. गोंधळ सुरू असतांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे त्यांच्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात आले. परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदरच त्यांनी अगोदर समजूत काढून आणी नंतर बळाचा वापर करून नागरिकांना रांगेत उभे करीत लसीकरण सुरू केले.

sillod
अवकाळी पावसाचा कहर! निलंग्यात पाच गावातील आठ जनावरे दगावली

सोशल डिस्टनसिंगचा फज्जा-

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल डिस्टनसिंग ठेवणे आवश्यक आहे. ज्या कारणासाठी लस घ्यावयाची आहे. त्याचाच प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता उपजिल्हा रुग्णालयात दररोज दिसत आहे. नियंत्रणाच्या बाहेर गर्दी होत असून, यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी आता रुग्णालयास नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा येथुनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com