अवकाळी पावसाचा कहर! निलंग्यात पाच गावातील आठ जनावरे दगावली

गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे आंबा या फळपीकाचे मोठे नुकसान झाले आहे
nilanga
nilanganilanga

निलंगा (लातूर): गेल्या पंधरा दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने (heavy rain) शुक्रवारी (ता. 7) रोजी कहरच केला. तालुक्यातील पाच गावात विज पडून आठ जनावरे दगावली असून हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या (farmer in nilanga) जिवावर बेतला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे आंबा या फळपीकाचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरीही वैतागला असून शेतातील मेहनत करणे अवघड झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सरदारवाडी येथे बाबुराव तळभोगे यांच्या शेतात बांधलेले दोन हाणम जातीचे बैल व एक म्हैस विज पडून दगावली आहे. यामुळे दोन लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

nilanga
मराठवाड्यातील मोठ्या धरणांत ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक

तांबाळा येथील तुकाराम म्हेत्रे याचे एक बैल व एक गाय विज पडून मृत झाले असून एक लाखाचे नुकसान झाले आहे. ममदापूर येथील पांडुरंग बिराजदार यांचे एक म्हैस विज पडून नुकसान झाले झाले आहे. तर ताडमुगळी येथील श्याम हिरामजी याचे एक बैल विज पडून दगावली आहे. तालुक्यातील पाच गावातील आठ जणावरे विजपडून दगावली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com