Sillod News : नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना मिळणार मदत ; खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू

नुकसान झाले एकाचे, मदत दुसऱ्यालाच’ या मथळ्याखाली डिसेंबर महिन्यात सकाळने वृत्त प्रकाशित करून निल्लोड (ता. सिल्लोड) येथे मदतीपासून वंचित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडली होती.
onion
onionsakal

सिल्लोड : ‘नुकसान झाले एकाचे, मदत दुसऱ्यालाच’ या मथळ्याखाली डिसेंबर महिन्यात सकाळने वृत्त प्रकाशित करून निल्लोड (ता. सिल्लोड) येथे मदतीपासून वंचित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडली होती. याची दखल घेऊन महसूल प्रशासनाने अतिवृष्टी नुकसानीच्या याद्यांची पुन्हा तपासणी करीत वंचित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवकाळी पावसाचा फटका, त्यात भरीस भर म्हणून महसूल प्रशासनाने केलेल्या प्रतापामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार निल्लोड (ता. सिल्लोड) येथे घडला होता. निल्लोड येथे कांदा लागवड केलेल्या ५३ शेतकऱ्यांचीच नावे अनुदानाच्या यादीतून वगळण्यात आली होती तर ज्यांनी कांदा लागवडच केलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांची नावे नुकसानीच्या यादीमध्ये आल्याने येथील कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

याबाबत माहिती मिळताच सकाळने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आणला होता. सकाळने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना शासन मदतीची रक्कम मिळाली असून, शेतकऱ्यांनी सकाळचे आभार मानले आहेत.

सकाळने गरजू कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नास वाचा फोडली. त्यामुळे महसूल प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित असलेल्या ५२ शेतकऱ्यांना ३ लाख ८४ हजार रुपयांचे अनुदान दिले आहे.

— अक्षय मगर, उपसरपंच, ग्रामपंचायत, निल्लोड.

नुकसान होऊनही आमची नावेच यादीत नव्हती, मात्र नुकसानीची दखल घेऊन शासन मदतीची रक्कम मिळवून देण्यामध्ये सकाळ वृत्तपत्राचा मोठा वाटा आहे. सकाळमुळे आम्हाला मदत मिळाली.

— कृष्णा गोराडे.

शेतकरी, निल्लोड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com