esakal | अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक !
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Aurangabad News

मराठवाड्यातही वन्य प्राण्यांवर होताहेत विष प्रयोग,  
केरळसारखेच प्रकार ः वन्यजीवांसाठी जागरूकतेची गरज 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक !

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : केरळ येथे एका हत्तीणीला अननसाच्या माध्यमातून स्फोटके खाऊ घालण्याचा प्रकार घडला. यात या हत्तीणीचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातही वन्य प्राण्यांवर विष प्रयोग करण्याचे प्रकार सुरू आहेत. नीलगाय, रानडुक्कर व मोरांवर विषप्रयोग केले गेले आहेत. याच्या नोंदीही वनविभागाकडे आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागरूकतेची गरज निर्माॉण झाली आहे.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली 


 मराठवाड्यात वनक्षेत्र हे तीन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वनक्षेत्रवाढीचे उपक्रम धूमधडाक्यात राबविले जातात. मात्र, कागदोपत्रीच जोर असल्याने वनक्षेत्रात अर्धा टक्केही वाढलेले नाही. यातच जंगल कमी झाल्यामुळे नीलगायी, रानडुक्करे, काळवीट, मोर हे अन्न पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येतात. यात काही वेळा हे वन्यजीव शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी व इतर शिकार करणारे लोक विष प्रयोग करतात. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान 

औरंगाबाद जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात तारा लावून शिकार करण्याची पद्धत आहे. या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून रानडुक्करे, नीलगायींसह वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. अशा काही नोंदीही वन विभागाकडे आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी काही ठिकाणी बिबट हे अन्न पाण्याने मिळेल याची नोंद वन विभागाकडे आहेत. तर २०१७-१८ या वर्षात कन्नड तालुक्यात चार मोर दगावल्याची नोंद आहेत. त्या मोरांवर विषप्रयोग केला गेला होता. याची नोंदही वन विभागाकडे आहे. 

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  


वन्यजीव मानवी वस्तीकडे येण्याची ही आहे कारणे... 
वनक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. शिवाय वन क्षेत्रात अतिक्रमणेही मोठ्या प्रमाणावर झालेली असून अनेक ठिकाणी बंगले बांधण्यात आले आहेत. अनेक जंगलात प्राण्यांसाठी पाणवठे नाहीत, नैसर्गिक तलावही नाहीत. त्यांना खाद्यपदार्थ साठी लागणारे झाडेझुडपे नसल्याने हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येतात. गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी बिबटे मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 


औरंगाबाद विभागात आढळणारे वन्यजीव 

  1.  विभागात जवळपास तीन ते चार हजार नीलगाई आहेत 
  2.  सात ते आठ हजारांहून अधिक मोर आहेत. 
  3. चार ते पाच हजारांच्या आसपास रान डुक्करे आहे. 
  4. जवळपास तीन ते चार हजार काळवीट आहेत. 

मुळात मराठवाड्यात जंगले कमी असली तरी जैवविविधता चांगली आहे. मराठवाडा जर हिरवागार करायचा असेल तर जैवविविधतेचे संवर्धन होणे गरजेचे आहेत. सरकारने जैवविविधता नोंद ठेवण्यासाठी कायदा केला आहे. त्या कायद्यानुसार या जैव विविधतेची नोंद घेणे गरजेचे आहे. आजकाल बिबट जास्त दिसायला लागले आहेत. जंगलातील हा बिबट आता उसाच्या क्षेत्रात येतोय. त्याला लागणारे खाद्य हे जंगलात नसल्याने ते मानवी वस्तीकडे येत आहेत. वन्यप्राणी माणसावर कधी हल्ला करत नाही आणि नुकसानही करत नाही, पण आता त्यांना खाद्यच मिळत नसल्याने ती मानवी वस्तीकडे येत आहेत. काळविटांनाही लागणारे खाद्य कमी झाल्याने ते वैजापूर, कन्नड या भागात सर्वाधिक आढळतात. या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी माणसांनीच पुढे यायला पाहिजेत. 
-दिलीप यार्दी, पक्षीमित्र 

loading image
go to top