Mohan Bhagwat : राममंदिरासाठी लोकांनी दिली जमापुंजी ; डॉ. मोहन भागवत, दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाचा सोहळा

आयोध्येतील राममंदिरासाठी धनसंग्रह होईल, अशी अपेक्षा नव्हती. परंतु, तीस वर्षांचा संघर्ष आणि आयोध्येत राममंदिर उभारावे, ही लोकांची इच्छा.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatsakal

छ्त्रपती संभाजीनगर : आयोध्येतील राममंदिरासाठी धनसंग्रह होईल, अशी अपेक्षा नव्हती. परंतु, तीस वर्षांचा संघर्ष आणि आयोध्येत राममंदिर उभारावे, ही लोकांची इच्छा. यामुळे सकारात्मक वातावरणनिर्मिती झाली. जेव्हा मंदिर बनणार असे वृत्त आले, तेव्हा कधीतरी मंदिर बनणारच, या आशेने लोकांनीच जमा केलेली पुंजी दिली, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी (ता. ११) सांगितले.

सातारा परिसरातील स्व. दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती. डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, की संघ जे करतो ते योग्यच करेल, अशी भावना ठेवून लाखो स्वयंसेवक काम करत आले. म्हणून आज हे विशाल स्वरूप आपण पाहू शकतो.

परंतु, ज्या समर्पण व त्यागामुळे ही स्थिती आली आहे, ती कधीही विसरता कामा नये. या वास्तूच्या उभारणीमुळे सर्वांना आनंद होतोय, पण हा आनंद ज्यांच्यामुळे आला, त्यांची तपश्चर्या सर्वांनी पाहिलेली नाही; तसेच तब्बल ५७ टक्के असलेल्या नवीन पिढीला आणीबाणी, फाळणी आणि स्वातंत्र्याचा लढा पुरेसा माहीत नाही. त्यामुळे आपण जे सुखद परिणाम पाहतो, त्यामागे निष्काम परिश्रम आहे, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

Mohan Bhagwat
Pune Leopard News : पालकांच्या कुशीतील बालिकेला बिबट्याने पळवले

कार्यक्रमप्रसंगी राममंदिराच्या उभारणीत योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्यवाह दिगंबर नाईक यांनी आभार मानले. छत्रसाल पांडव यांनी वैयक्तिक गीत सादर केले. सुरवातीला ‘खेलकूद’ ॲपचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते झाले. यामध्ये १६ प्रकारांत सहाशेहून अधिक खेळ समाविष्ट आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत होईल : कोटगिरे

दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाचे ‘समर्पण’ असे नामकरण झाले. भाले हे संघाचे प्रचारक होते व मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आर्थिक कारणांमुळे त्यावेळेस काही शक्य झाले नाही, परंतु संघाच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी त्यावेळी एक एकर जागा घेऊन ठेवली होती. अलीकडच्या काळात काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला व ही वास्तू साकार झाली. यात विद्यार्थ्यांना निवास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, ग्रामविकास, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, योगाभ्यास आदींचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी उपयोग होणार असल्याचे कोटगिरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com