

Hard Work Pays Off: Farmer’s Mechanic’s Daughter Achieves Agriculture Officer Post
Sakal
-दत्ता देशमुख
बीड : आई-वडिलांनी हातात पाणा-पक्कड, मार्तुल घेऊन शेतकऱ्यांचे जळालेले कृषिपंप दुरुस्त करून मुलांना शिक्षण दिले... मुलीनेही त्यांच्या कष्टाची जाण ठेवत मेहनत केली... ही मेहनत फळाला आली आणि लेकीने एमएपीएससीच्या कृषी सेवा परीक्षेत राज्यातून २४ वा क्रमांक मिळवत वर्ग एकच्या अधिकारीपदाला गवसणी घातली. ही कहाणी आहे तालुक्यातील काकडहिरा येथील शेतकरी कुटुंबातील रेणुका बागलाने हिची.