bank money withdraw
sakal
छत्रपती संभाजीनगर - मागील १० वर्षांपासून काहीच व्यवहार झाला नाही, अशा बँक खात्यातून आपले पैसे मिळवण्यासाठी शेवटचे २३ दिवस उरले आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच यासाठी खातेधारकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. त्यामुळे अशा खातेदारांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी बँकेत जाऊन आपले पैसे मिळवण्याची ही संधी गमावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.