Chhatrapati Sambhajinagar : देवगिरी किल्ल्यावर लातूरच्या पर्यटक तरुणाचा मृत्यू

ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या लातूरच्या तरुणाचा तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १७) दुपारी अडीच ते तीनदरम्यान घडली.
Death of young tourist from Latur at Devagiri fort
Death of young tourist from Latur at Devagiri fortSakal

दौलताबाद : ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या लातूरच्या तरुणाचा तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १७) दुपारी अडीच ते तीनदरम्यान घडली. रत्नदीप शिवानंद कांबळे (वय ३०, रा. लातूर, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रविवारची सुटी असल्याने रत्नदीप कांबळे आपल्या मित्रांसोबत पर्यटनासाठी देवगिरी किल्ला पाहण्यासाठी आला होता. मित्रांसोबत किल्ल्यावर पर्यटन करून परतत असताना अंधारीच्या वर असलेल्या गणपती मंदिराजवळ भुरळ येऊन तो खाली कोसळला. मित्रांनी त्याला तत्काळ जवळच गणपती मंदिराच्या सावलीत घेऊन आरडाओरडा केला.

येथे फिरण्यासाठी आलेल्या केंद्रीय राखीव दलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणांना मदत करत रत्नदीपला झोळी करून किल्ल्याखाली आणले. फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रिक्षामधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.

स्पर्धा परीक्षेची करत होता तयारी

मृत रत्नदीप शिवानंद कांबळे हा अहिल्यादेवी चौक हळी, ता. उदगीर, जि. लातूर येथील असून, छत्रपती संभाजीनगर येथे तो एमपीएससीची पूर्वतयारी करत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com