'डेल्टा'चा रूग्ण औरंगाबाद जिल्ह्याशेजारी, निर्बंधात होणार वाढ!

'डेल्टा'चा रूग्ण औरंगाबाद जिल्ह्याशेजारी, निर्बंधात होणार वाढ!

औरंगाबाद : राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण Delta And Delta Plus Variant आढळत आहेत. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात Delta Variant In Jalgaon या व्हेरीएंटचे रुग्ण आढळल्याने आपल्याला सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जळगावला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील एन्ट्री पॉईंटवर (चेक नाके) आरटीपीसीआर चाचण्या Corona कडक करण्यात येणार असून चाचणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण District Collector Sunil Chavan यांनी सांगितले. राज्य शासनाच्या आदेशानुसार औरंगाबाद Aurangabad जिल्हा ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लेवल तीनमध्ये आहे. लेवल ३ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुकाने तसेच सर्व खासगी आस्थापनांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जाणार आहेत. कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सोमवारी (ता.२८) होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय होईल असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी म्हटल आहे.delta and delta plus variant found in jalgaon near to aurangabad

'डेल्टा'चा रूग्ण औरंगाबाद जिल्ह्याशेजारी, निर्बंधात होणार वाढ!
प्रदेशाध्यक्षांच्या समोरच राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर

जिल्ह्याची क्षमता बांधणी करा

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २५ ) कोविड उपाययोजनांच्या आढावा बैठक झाली. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी प्रशिक्षित मनुष्यबळ, उपचार सुविधा, साधन सामग्रीसह सज्ज होत जिल्ह्याची क्षमता बांधणी करावी असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील उपचार सुविधा, ऑक्सिजन निर्मितीसह खाटांची पर्याप्त उपलब्धता याबाबीमध्ये वाढ होत असून तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची संभाव्य व्याप्ती लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, मनपासह सर्वांनी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ठेवण्यास प्राधान्य द्यावे. त्यादृष्टीने घाटीमध्ये व्हेंटीलेटर, आयसीयु व्यवस्थापन आणि बाल कोविड उपचार याचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अधिक संख्येने घ्यावेत.

प्रवेश नाक्यावर चाचणी केंद्रे सुरू ठेवा

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्णसंख्येत घट होत आहे. जिल्ह्याचा बाधीत दर कमी होत असून सर्व व्यवहार सुरु असल्याने नागरिकांनी संसर्गापासून सुरक्षित राहण्याची खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लसीकरण आणि चाचणीसाठी नागरिकांनी पुढे यावे. शहर आणि जिल्ह्याच्या प्रवेश नाक्यावरील चाचणी केंद्रे सुरू ठेवावीत. फैलाव अधिक प्रमाणात ज्यांच्यापासून होऊ शकतो अशा सुप्रर स्प्रेडर हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी यासह सर्व संबंधितांनी प्राधान्याने चाचण्या आणि लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन, आरटीओ, उत्पादन शुल्क, वजनमापे या सह सर्व संबंधित यंत्रणानी पाहणी करुन याबाबींवर नियंत्रण ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे तसेच रुग्णालयांचे इलेक्ट्रीक ऑडीटचे अहवाल ही सादर करण्याचे निर्देश संबंधितांना जिल्हाधिकारी यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com