औरंगाबाद महापालिका भ्रष्टाचाराचा महाअड्डा : फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद महापालिका भ्रष्टाचाराचा महाअड्डा : फडणवीस

औरंगाबाद महापालिका भ्रष्टाचाराचा महाअड्डा : फडणवीस

औरंगाबाद : औरंगाबादची महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचा घणाघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून यासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपच्यावतीने आज जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. (Devendra Fadanvis On Aurangabad Issue)

हेही वाचा: फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला; मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की...

फडणवीस म्हणाले की, या शहराला काही मिळाले असेल तर, ते भाजपच्या सरकारच्या काळातच मिळाले आहे. वैधानिक विकास महामंडळाचा या सरकार मुडदा पाडला. मराठवाडा वॉटर ग्रीडही या सरकारनं मारुन टाकल्याचे ते म्हणाले. या सरकारच्या काळात समांतर पाणी योजनाही पुढे सरकली नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्सची फाडाफाडी

यावेळी उपस्थित नागरिकांना आणि शहरवासियांना जोपर्यंत तुम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि कुणाला झोपू देणार नाही. एवढेच नव्हे तर, या कुंभकरणासारख्या झोपलेल्या सरकारमधील एकेका नेत्याला आम्ही जाब विचारु असे म्हणत या नंतरही या सरकारची कुंभकर्णी झोप उघडली नाही तर या सरकारला कोणीही वाचवू शकत नाही. पाण्यासाठीची ही लढाई आम्ही जिंकणार असे म्हणत पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला दिला.

आम्ही पाणी पुरवठा योजना तयार करायला लावली ती १६८० कोटी रुपयांची योजना तयार केली. यामध्ये महापालिकेनं काही भाग भरायचा होता. पण महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता आम्ही पालिकेचा ५०० कोटींचा हिस्साही भरायला तयार झालो. पण दुर्देवानं सरकार बदललं आणि सात महिने वाटाघाटी करत यांचा पूर्ण अर्थपूर्ण सौदा ठरला त्यानंतर टेंडर देण्यात आलं. योग्य वेळेत टेंडर दिलं असतं ते मॅनेज केलं नसतं तर ४० किमी पाण्याची लाईन तयार झाली असती. पण आता अर्धा किमी लाईन तयार झाली नाही.

Web Title: Devendra Fadanvis Allegation On Aurangabad Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top