औरंगाबाद : फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; काय म्हणाले जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; काय म्हणाले जाणून घ्या सविस्तर
औरंगाबाद : फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; काय म्हणाले जाणून घ्या सविस्तर

औरंगाबाद : फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; काय म्हणाले जाणून घ्या सविस्तर

औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून यासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपच्यावतीनं जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पैठण गेट ते क्रांती चौक दरम्यान मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते आणि औरंगाबादची जनता सहभागी झाली होती. या मोर्चाचं नेतृत्व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यानंतर आता ते औरंगाबादच्या जनतेला संबोधित केलं. (Devendra Fadnavis at Aurangabad in BJP Jal Akrosh Morcha)

फडणवीस : मी तुम्हाला आश्वासन देतो की जोपर्यंत तुम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही. एकेका नेत्याला आम्ही जाब विचारु. आत्ताही या सरकारची कुंभकर्णी झोप उघडली नाही तर या सरकारला कोणीही वाचवू शकत नाही. विश्वासानं सांगतो ही लढाई आम्ही जिंकणार पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

फडणवीस : औरंगाबादची महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनलं आहे. या शहराला काही मिळालं असेल तर ते भाजपच्या सरकारच्या काळातच मिळालं. वैधानिक विकास महामंडळाचा या सरकार मुडदा पाडला. मराठवाडा वॉटर ग्रीडही या सरकारनं मारुन टाकलं आहे. समांतर पाणी योजना पुढे सरकलीच नाही.

फडणवीस : आत्ताच्या राज्यांना संभाजीनगरशी काहीही देणघेणं नाही. औरंगाबाद-संभाजीनगर हे मराठवाड्याचं मुख्यालय आहे. याची कल्पना मुख्यमंत्र्यांना नाही त्यामुळं त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणायचं की नाही असा प्रश्न पडतो. जो जो जनतेच्या विरोधात जाईल जनता त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

फडणवीस : आम्ही पाणी पुरवठा योजना तयार करायला लावली ती १६८० कोटी रुपयांची योजना तयार केली. यामध्ये महापालिकेनं काही भाग भरायचा होता. पण महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता आम्ही पालिकेचा ५०० कोटींचा हिस्साही भरायला तयार झालो. पण दुर्देवानं सरकार बदललं आणि सात महिने वाटाघाटी करत यांचा पूर्ण अर्थपूर्ण सौदा ठरला त्यानंतर टेंडर देण्यात आलं. योग्य वेळेत टेंडर दिलं असतं ते मॅनेज केलं नसतं तर ४० किमी पाण्याची लाईन तयार झाली असती. पण आता अर्धा किमी लाईन तयार झाली नाही.

फडणवीस : आमच्या आक्रोश मोर्चात एक ८० वर्षाची आजी हंडा घेऊन सामिल झाली होती. मुख्यमंत्र्यांना माझं आवाहन आहे की, झुकेगा नही वाल्या आजीला तुम्ही भेटले पण पाण्यासाठी भटकणाऱ्या आमच्या ८० वर्षांच्या आजीला तुम्ही भेटणार आहात का?

फडणवीस : बेईमानांमुळं या संभाजीनगरला तहानलेलं ठेवलं आहे. माझ्या मोर्चाला किती अटी टाकल्या. पण हा जनसागर आहे, जो थांबू शकत नाही. शिवसेनेचे मित्र जनआक्रोश मोर्चाचे पोस्टर फाडत होते. पण तुम्ही हा आक्रोश फाडू शकत नाही. जेव्हा सकाळ-संध्याकाळी नळ उघडल्यावर हवा येते अशा परिस्थितीत आमची माय-माऊली तुम्हाला मनातल्या मनात शिव्याशाप देते. हेच शिव्याशाप तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही.

फडणवीस : आम्ही संघर्ष छेडलाय आम्ही सरकारला इशारा देतोय की हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल.

देवेंद्र फडणवीस : संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात अभूतपूर्व मोर्चा असेल तर तो आजचा मोर्चा आहे. याच रस्त्यावरुन भाजपनं यापूर्वी २०१३ मध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चात आम्ही सांगितलं होतं की सत्ता परिवर्तन अटळ आहे आणि आता याच रस्त्यावरुन पुन्हा मोर्चा निघालाय. सत्ता परिवर्तन तर अटळच आहे. हा मोर्चा भाजपचा नाही हा जनतेचा मोर्चा आहे. हा मोर्चा जनतेचा आक्रोश आहे. जनतेचा आक्रोश एकवटाचं काम भाजपनं केलं आहे.

दानवे : हा मोर्चा भाजपचा मोर्चा नाही, हा औरंगाबादकरांचा मोर्चा आहे. या मोर्चाला सर्वांनी पाठींबा द्यावा.

दानवे : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना १६०८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. पण भाजप-शिवसेनेची सत्ता होती पण आमची मतं चोरीला गेली पण आता चोर सापडला आहे. त्यामुळं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या चोराला शिक्षा द्यायची आहे.

रावसाहेब दानवे : या सरकरला उद्यापासून महाविकास आघाडीचं सरकार म्हणायचं नाही तर जुम्मे के जुम्मेचं सरकार म्हणायचं. हे सरकार अमर-अकबर-अँथोनीचं सरकार सरकार आहे. यांच्यामध्ये कधीही नेते एकत्र बसत नाहीत.

Web Title: Devendra Fadnavis At Aurangabad In Bjp Jal Akrosh Morcha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top