esakal | Ashadi Ekadashi: प्रवेशद्वारातूनच नाथांचे भाविकांनी घेतले दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण (जि.औरंगाबाद) : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी प्रवेशद्वारातूनच संत एकनाथ महाराज समाधी मंदिराचे दर्शन घेताना भाविक.

Ashadi Ekadashi: प्रवेशद्वारातूनच नाथांचे भाविकांनी घेतले दर्शन

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) मंगळवारी (ता.२०) मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच भाविकांनी संत एकनाथ महाराज (Sain Eknath Maharaj) यांचे दर्शन घेतले. पंचक्रोशीतील भाविकांची वर्दळ सुरू होती. दरवर्षी आषाढी एकादशीला मंदिर परिसर गजबजून जातो. कोरोनामुळे (Corona) दुसऱ्या वर्षीही गोदाकाठावरील नाथांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही. दरम्यान, नाथांच्या समाधी मंदिरात सकाळी विधिवत पूजा व आरती झाली. आषाढीची वारी असल्यामुळे सकाळी आठपासूनच (Paithan) टप्प्याटप्प्याने पंचक्रोशीतील भाविक नाथनगरीत दाखल होत होते. बघता बघता भाविकांची गर्दी वाढत गेली. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून प्रवेशद्वारातूनच नाथांचे दर्शन घेतले. काही भाविकांनी सकाळी गोदाकाठी स्नानही केले. पोलिस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर (Nath Temple) परिसरात बंदोबस्त ठेवला. (devotees take darshan saint eknath maharaj temple in paithan aurangabad glp 88)

हेही वाचा: अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लस न घेतल्यास पगार थांबणार

बाहेरचे भाविक आलेच नाहीत

इच्छा असूनही विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ न शकणारे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भातील भाविक आषाढी वारीनिमित्त पैठणला येण्याची परंपरा आहे. यंदाही यात्राबंदी व नाथमंदिर बंद असल्यामुळे बाहेरहून येणाऱ्या भाविकांची उपस्थिती यंदा दिसली नाही.

loading image