esakal | अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लस न घेतल्यास पगार थांबणार
sakal

बोलून बातमी शोधा

कोविशिल्ड लस

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लस न घेतल्यास पगार थांबणार

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : महापालिकेत ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण झाले, नसेल त्यांचे वेतन थांबविण्याबाबतच्या आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी मंगळवारी (ता.२०) काढले आहेत. कोविडच्या (Covid19) वाढत्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असलेल्या महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडत असताना शहरातील (Nanded) विविध ठिकाणी स्थळ पाहणी, भेटी द्याव्या लागतात. अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोना व इतर अनुषंगिक विषाणुमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना लसीकरण करून घेण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, नांदेड महापालिकेतील (Nanded Municipal Corporation) अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोरोना लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. (no corona vaccination then no salary for officers and staffs in nanded municipal corporation glp88)

हेही वाचा: शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी, आजी-माजी आमदारांमधील मतभेद उघड

ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनी त्याबाबतचे प्रमाणपत्र लेखा विभागाकडे सादर करावे. त्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याचे वेतन अदा केले जाणार आहे. ज्या अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना लस घेऊ नये, अशा डॉक्टरांच्या सूचना आहेत. त्यांनी त्यांच्या उपचाराबाबतचे कागदपत्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Corona Vaccination) यांच्याकडून पडताळणी करून तसे प्रमाणपत्र घ्यावे आणि ते ता. २६ जुलैपर्यंत लेखा विभागाला सादर करावे. अन्यथा संबंधितांचे जुलै महिन्याचे वेतन होणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

loading image