Kirtan Booking Dispute Between Two Maharajs Turns Violent in Dharashiv
esakal
धाराशिव : कीर्तनाच्या सुपारीवरून दोन कीर्तनकार महाराजांमध्ये झालेल्या जुन्या वादाचे रूपांतर हाणामारीत (Dharashiv kirtankar fight) झाले. या घटनेनंतर एका कीर्तनकाराने बाल वारकऱ्यांना सोबत घेत थेट राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केल्याने तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली. भर उन्हात आंदोलन केल्याने एका बाल वारकऱ्याला भोवळ आल्याने त्याला उपचारासाठी हलवावे लागले. या प्रकारामुळे प्रवाशांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.