18 year old girl killed in truck accident
esakal
चित्तेपिपंळगाव : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर, वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.