Chhatrapati Sambhajinagar: ‘ओटीपी’च नाही, तुमची ओळखही तपासली जाणार;डिजिटल सुरक्षेच्या नव्या युगाकडे बँकिंग क्षेत्राची वाटचाल, सुरक्षा पडताळणी होणार कडक

OTP Alone No Longer Sufficient for Digital Banking: ओटीपीवर आधारित व्यवहार आता अपुरे; डिजिटल बँकिंगमध्ये ग्राहकाची ओळख चेहरा, बोटांचे ठसे, मोबाइल आणि व्यवहाराची सवय तपासून केली जाईल.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ‘तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी कोणालाही सांगू नका’, हा इशारा गेल्या काही वर्षांत प्रत्येक बँक ग्राहकासाठी चांगलाच परिचयाचा झाला आहे. मात्र, आता केवळ ओटीपीवर आधारित सुरक्षा पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डिजिटल व्यवहार व्यवस्थेत मोठे बदल केले जात आहेत. आता ग्राहकाची ओळख दोन किंवा अधिक स्तरांवर तपासली जाणार आहे. त्यात मोबाइलची ओळख, ग्राहकाचा चेहरा, बोटांचे ठसे, व्यवहाराची सवय, वापरलेले उपकरण, व्यवहाराचे ठिकाण यांचा समावेश असेल. यामुळे भविष्यात केवळ ओटीपी मिळाला म्हणून व्यवहार लगेच पूर्ण होणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com