Aurangabad : रब्बी सिंचनासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jaikwadi dam
रब्बी सिंचनासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग

रब्बी सिंचनासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पैठण : यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रथम सिंचन पाळी म्हणून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रविवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता आवर्तन सुरू करण्यात आले. १०० क्युसेक्सने सुरू केलेल्या या विसर्गात वाढ करत डाव्या कालव्यातून ३०० क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे.

‘‘या पाण्याचा औंरगाबाद, जालना व परभणी या तीन जिल्ह्यांतील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा अपेक्षित आहे’’, असे जायकवाडी धरणाचे सहाय्यक अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. सध्या जायकवाडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्याचे निर्णय पाटबंधारे विभागाच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार जायकवाडी प्रशासनाने रविवारी सकाळी दहा वाजता धरणाच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेकप्रमाणे पाणी सोडण्यास सुरवात केली.


‘‘सध्या शेतकरी रब्बी हंगामातील गहू, बाजरी, ज्वारी, तूर, हरभरा, मका, ऊस आदी पिकांना पाणी देत आहे. या आवर्तनाचा पिकांना, ऊस, डाळिंब व मोसंबीच्या फळबागांना फायदा होणार आहे. अगोदर जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २, परभणीसाठी कालवा साखळी क्रमांक १२२ किलोमीटरपर्यंत पाणी पोच करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करून तो १२०० क्यूसेक पर्यंत नेला जाणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार तो कमी अधिक केला जाणार आहे’’, असे काकडे यांनी सांगितले.

हेही वाचा: अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील दोन कोटीचे साऊंड बाॅक्स चोरीला

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सोडले आहे. सध्या परभणी जिल्ह्यातील १२२ किलोमीटरपुढील सिंचन करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाव्दारे पाण्याचा योग्य वापर करावा.
- प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता.

सध्या रब्बी हंगामासाठी योग्य वेळी पाणी सोडण्यात आले आहे. परंतु पाणी उपसण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा व्यवस्थित करावा. जेणेकरून, शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता येईल.
अॅड. किशोर वैद्य, प्रगतिशील शेतकरी.

loading image
go to top