रब्बी हंगामासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०० क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यात आले

औरंगाबाद : रब्बी हंगामासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग

जायकवाडी : रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रविवार(ता.२१) सकाळी दहा वाजता पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. २०० क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे.

य पाण्याचा औंरगाबाद, जालना व परभणी या तीन जिल्ह्यातील १ लाख ४१ हेक्टर क्षेत्राला पाण्याचा फायदा होणार असल्याचे जायकवाडी धरणाचे सहाय्यक अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. सध्या जायकवाडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्याचे निर्णय पाटबंधारे विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार जायकवाडी प्रशासनाने रविवारी सकाळी दहा वाजता धरणाच्या डाव्या कालव्यातून दोनशे क्युसेस प्रमाणे पाणी सोडले.

हेही वाचा: नाशिक : राज्यात सिन्नर दुसरे कचरामुक्त शहर

डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यातील लाखो एकर शेतजमिनीसाठी फायदा होणार आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामातील गहू, बाजरी, ज्वारी, तूर, हरभरा, मका, ऊस आदी पिकांची लागवड करण्यात आलेल्या पिकांना पाणी देत आहे. डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचा या पिकांना व तसेच ऊस या बारमाही पिकाला व डाळिंब व मोसंबीच्या फळबागांना फायदा होणार आहे.

जायकवाडी डाव्या कालव्यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या परभणी जिल्ह्यातील १२२ किलोमीटर पुढील सिंचन करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व्दारे पाण्याचा योग्य वापर करावा.

-प्रशांत जाधव (कार्यकारी अभियंता)

loading image
go to top