राज्यात सिन्नर दुसरे कचरामुक्त शहर | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्र शासनाचा पुरस्कार  पश्चिम विभागात मिळाले दहावे मानांकन

नाशिक : राज्यात सिन्नर दुसरे कचरामुक्त शहर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगरपरिषदेला कचरा मुक्त शहर म्हणून नगरपरिषदस्तरावर राज्यात दुसरे मानांकन मिळाले आहे. देशातील पश्चिम विभागात १० वे मानांकन मिळाले असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते सिन्रनचे मुख्याधिकारी संजय केदार, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शहरवासीयांचे योगदान ः डगळे

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात सिन्नर नगपरिषदेने सक्रीय सहभाग घेत कचरामुक्त शहर व्हावे यासाठी विशेष कार्य केले आहे. गेल्या काही वर्षांत सिन्नर नगरपरिषद करत असलेले कार्य खूप कौतुकास्पद असल्याचे सांगत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी कौतुक केले आहे. आपले सिन्नर स्वच्छ व सुंदर असावे यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारींनी दैनंदिन कार्यात स्वच्छतेला प्राधान्य देऊन उल्लेखनीय काम केले. या कार्यास सिन्नरवासियांनी योग्य साथ दिल्याने हा पुरस्कार मिळाल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सांगितले.

हेही वाचा: नागपूर : तापाच्या भीतीने लसीकरणात घट

नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांचेसह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह सर्वांच्या सहकार्यामुळे हा बहुमान मिळाला असे स्वच्छता निरीक्षक श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

आता जबाबदारी वाढली ः केदार

नागरी सुविधा पुरवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग कार्य करत असतो. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मागील काही वर्षांत स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देत सिन्नर नगरपरिषदेने कार्य केले आहे, त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. आता आम्ही अधिक जोमाने काम करू असे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले.

loading image
go to top