Identity card Distribution to transgender
Identity card Distribution to transgenderSakal

...अन् तृतीयपंथीयांनाही मिळाली ‘ओळख’

सामाजिक न्याय व अपंग पुनर्वसन विकासच्यावतीने ओळखपत्रांचे वाटप

औरंगाबाद - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाच्यावतीने तृतीयपंथीयांचे हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. समाजकल्याण सहायक आयुक्त पी. जी. वाबळे, चंद्रकांत पाटील, जितेंद्र सोनवणे, शिल्पा शेख, राणी शेख, मुस्कान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिल्पा गुरू यांनी तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या व्यथा मांडल्या. ओळखपत्र नसल्याने समाजमान्य नागरिक नाहीत तसेच व्यथा, अडचणींकडे दुर्लक्ष केले जाते. समाज मोकळेपणाने स्वीकारत नसल्याने तृतीयपंथीय चौकट स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय राहत नाही. वाळीत टाकल्यामुळे अनेक शिकलेल्या तृतीयपंथीयांवर भीक मागण्यावाचून दुसरा पर्याय नाही. ओळखपत्र नसल्याने अनेक अडचणी यायच्या. प्रशासनाकडे मागणी, पाठपुरावा केल्यामुळे आता कुठेतरी न्याय मिळत आहे. अजूनही तृतीयपंथीयांना स्वतःचे घर, स्वतंत्र जागा नाही. घरकुल योजना मंजूर व्हायला हवी, अशी मागणी असून यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शिल्पा शेख यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तूर्तास प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ज्यांना ओळखपत्र मिळाले नाहीत, त्यांनाही लवकरच ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे आश्वासन समाजकल्याण सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी दिले. प्रसंगी शुभांगी रेश्मा शेख, धन्नो शिल्पा शेख, गजरी शिल्पा शेख, आलिया गजरी शेख, सैना गजरी शेख, अल्ताप शेख, इच्छा धन्नो शेख, शबो धन्नो शेख, आरोही गजरी शेख, रिना राय, निकिता त्रिभुवन, सोनाली शेख यांच्यासह अन्य तृतीयपंथी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com