छत्रपती संभाजीनगर : अधिकाऱ्यांनी दुकानांना अचानक भेटी देऊन शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत का? निविष्ठा, बियाणे मिळतात का? खताची लिंकिंग केली जाते का? असे प्रश्न विचारले, तर शेतकरी ‘नाही साहेब, काही अडचणी नाहीत!’ असे सांगतात आणि दुकानापासून थोडं बाजूला गेले की, दुकानदाराच्या नावाने तक्रारींचा पाढा वाचतात.