
पैठण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळ्याला माउलींच्या जन्मस्थळी, आपेगाव (ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे गोदाकाठी बुधवारी (ता.१३) सुरवात होत आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोहळा आठ दिवस चालणार असून त्याची सांगता होणार असून २० ऑगस्टला देवगड संस्थानचे प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. संत ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थानचे प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी मंगळवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.