esakal | पक्षाचे निष्ठेने काम करा, फळ मिळतेच! भागवत कराडांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwat karad

पक्षाचे निष्ठेने काम करा, फळ मिळतेच! भागवत कराडांचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : भारतीय जनता पक्षाने (BJP) दिलेली जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून पार पाडावी, त्याचे फळ उशिरा का होईना मिळतच असते, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी रविवारी (ता.१२) केले. डॉ. भागवत कराड यांची केंद्रात वर्णी लागल्याबद्दल फुलंब्री शहरात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा (Aurangabad) नगराध्यक्ष सुहास शिरसाट, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, पंचायत समितीच्या सभापती सविता फुके, जिल्हा परिषदेचे गटनेते शिवाजी पाथ्रीकर, जि.प. सदस्य जितेंद्र जैस्वाल, भाजपचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, ओबीसी मोर्चा (OBC Morcha) तालुका अध्यक्ष राम बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: दिलासा! नांदेडमध्ये केवळ एकच जण कोरोना पॉझिटिव्ह

प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी डॉ. भागवत कराड यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. डॉ. भागवत कराड म्हणाले की, पक्षाचे काम करत असताना पूर्ण निष्ठेने काम करावे, पक्षाचे तिकीट मिळणार किंवा नाही मिळणार, याकडे लक्ष केंद्रित न करता आपले पक्षाचे काम एकनिष्ठेने करून आपापली जबाबदारी पार पाडावी. सूचित बोरसे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर, वडोद बाजारचे सरपंच डॉ. गोपाळ वाघ, सातळाचे सरपंच फारुक शेख, बापू घडामोडे, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, सर्जेराव मेटे, दत्ता मेटे, कामगार तालुकाध्यक्ष दादाराव तुपे, बाबासाहेब शिनगारे, रवींद्र काथार, अजय शेरकर, सुमीत प्रधान, देवराव राऊत, मयूर कोलते, अप्पाराव काकडे, राजेंद्र डकले, पंडित नागरे, राजेंद्र नागरे, प्रभाकर सोटम, विष्णू गाडेकर आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top