Sambhaji Nagar : फुलंब्री तालुक्‍यात नारीशक्तीचे वर्चस्व ; अधिकारी, पदाधिकारी, खेळाडू, कर्मचारी म्हणून नावलौकिक

एकूण ११८५ महिलांच्या हाती तालुक्याचा कारभार असून खऱ्या अर्थाने तालुक्यात महिलाराज सुरु असल्याचे चित्र आहे.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

फुलंब्री : बदलत्या काळानुसार स्त्रीची भूमिका बदलली असून स्त्री सुद्धा आता खऱ्या अर्थाने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे चित्र फुलंब्री तालुक्यात असून येथील अप्पर तहसीलदारांसह, पोलिस ठाणे, सभापती, सरपंच, वैद्यकीय अधिकारींसह तब्बल ११८५ महिला तालुक्याचा कारभार चालवीत आहे. यावरुन आजच्या महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दिसून येते.

फुलंब्रीत अप्पर तहसीलदार म्हणून मोगरकर, बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती सविता फुके, राष्ट्रीय नेमबाज गीता म्हस्के, तेजस्विनी मुळे, कराटे खेळाडू राजनंदिनी जाधव आदींसह महिलांचा प्रमुख कार्यालयात नारीशक्तीच बोलबाला असून ग्रामपंचायतीत तब्बल ३६ सरपंच गावाचा कारभार सांभाळत असून ३५ आरोग्य सेविका/सहायिका, १२७ आशा कार्यकर्ती कर्तव्य बजावत आहे. दुसरीकडे तालुक्यात ४६२ महिला शिक्षिका देशासाठी विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत. तसेच ०७ महिला ग्रामसेवक तालुक्यातील गावांमध्ये सेवा देत असून ०८ महिला तलाठीसुद्धा सजाची जबाबदारी सांभाळत आहे.

तालुक्यात तब्बल ४८९ अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस बालकांची काळजी घेत आहेत. तसेच फुलंब्री व वडोद बाजार ठाण्यात संरक्षणाची जबाबदारी १५ महिला पोलिस कर्मचारी पार पाडत आहे. अशा प्रकारे एकूण ११८५ महिलांच्या हाती तालुक्याचा कारभार असून खऱ्या अर्थाने तालुक्यात महिलाराज सुरु असल्याचे चित्र आहे.

अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी

  • • अप्पर तहसीलदार : ०१

  • • वैद्यकीय अधिकारी : ०४

  • • राष्ट्रीय नेमबाज खेळाडू : ०२

  • • महिला सरपंच : ३६

  • • आरोग्य सेविका/सहायिका : ३५

  • • आशा कार्यकर्ती : १२७

  • • महिला शिक्षिका : ४६२

  • • महिला ग्रामसेवक : ०७

  • • महिला तलाठी : ०८

  • • अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस : ४८९

  • • वडोद बजार व महिला पोलिस कर्मचारी : १५

शहरी भागातील पालक मुलींना उच्च शिक्षण देतात. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील पालकांनीही मुला-मुलीत भेदभाव न करता चांगले शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवावे. ग्रामीण भागात बाल विवाह रोखण्यासाठी घरा-घरातील आईंनी पुढाकार घ्यावा.

- अनुराधा चव्हाण, सभापती कृउबा समिती फुलंब्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com